Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. जळगाव महानगरपालिकेकडून (Recruitment in Jalgaon Municipal Corporation) विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जळगाव महानगरपालिकेकडून (Jalgaon Municipal Corporation) कनिष्ठ अभियंता, वायरमन, आरोग्य निरीक्षक आणि टायपिस्ट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी काय कराल? शेवटची तारीख काय? यासंदर्भात सर्व माहिती सविस्तर जाणून घेऊयात...                                       

  


पहिली पोस्ट : कनिष्ठ अभियंता (बांधकाम)


शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी


एकूण जागा : 10


वयोमर्यादा : 43 वर्षे           


अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन


अर्ज पाठवण्याची अंतिम दिनांक : 20 ऑक्टोबर 2023


अधिकृत संकेतस्थळ : jcmc.gov.in


दुसरी पोस्ट : वायरमन


शैक्षणिक पात्रता : तारतंत्री कोर्स उत्तीर्ण


एकूण जागा : 12


वयोमर्यादा : 43 वर्षे


अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन


अर्ज पाठवण्याची अंतिम दिनांक : 20 ऑक्टोबर 2023


अधिकृत संकेतस्थळ : jcmc.gov.in


तिसरी पोस्ट : आरोग्य निरीक्षक


शैक्षणिक पात्रता : स्वच्छता निरीक्षक कोर्स उत्तीर्ण


एकूण जागा : 10


वयोमर्यादा : 43 वर्षे


अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन


अर्ज पाठवण्याची अंतिम दिनांक : 20 ऑक्टोबर 2023


अधिकृत संकेतस्थळ : jcmc.gov.in


चौथी पोस्ट : टायपिस्ट/संगणक चालक


शैक्षणिक पात्रता : टंकलेखन आणि MS-CIT


एकूण जागा : 20


वयोमर्यादा : 43 वर्षे


अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन


अर्ज पाठवण्याची अंतिम दिनांक : 20 ऑक्टोबर 2023


अर्ज पाठविण्याचा पत्ता : आस्थापना विभाग, प्रशासकीय इमारत 10 वा मजला. सरदार वल्लभभाई पटेल टॉवर, महात्मा गांधी रोड, नेहरू चौक, जळगाव : 425001.


अधिकृत संकेतस्थळ : jcmc.gov.in


अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Job Majha : पुणे महानगरपालिका, रिझर्व्ह बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, 'या' जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु