जळगाव : 'एका तासात ज्या प्रमाणे क्लीप डिलीट करण्याची वेळ आली आहे. याच प्रमाणे लोकांच्या मनातुन भाजपा (BJP) उतली असून आता भाजप गायब होण्याचे हे संकेत यातून आता मिळत असल्याची गंभीर टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली  आहे. त्याचबरोबर या क्लिपप्रमाणेच आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील लोकांच्या मनातूनच ते डिलीट झालेले आहेत, त्यामुळे आता चर्चा कशाला, अशी मिश्किल टिप्पणी देखील पटोले यांनी केली 


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Congress) नाना पटोले आज जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज सकाळी माध्यमाशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान 'मी पुन्हा येईल' अशा स्वरूपाची देवेंद्र फडणवीस यांची क्लीप भाजपाकडून व्हायरल (Clip Viral) केली गेली होती. मात्र काही वेळातच त्यावर मोठा गदारोळ उठल्याने ती क्लिप एका तासात डिलीट करण्यात आली होती. या विषयावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीका केली आहे. ते म्हणाले की, 'एका तासात ज्या प्रमाणे क्लीप डिलीट करण्याची वेळ आली आहे. याच प्रमाणे लोकांच्या मनातुन भाजपा उतरली असून आता भाजप सुद्धा गायब होण्याचे हे संकेत यातून मिळत असल्याचे पटोले म्हणाले आहेत.  


पटोले आरक्षण (Reservation) मुद्द्यावर म्हणाले की, 'भाजपा खोटारडा पक्ष असून त्यामुळे राज्यात तसच राहणार आहे. 2014 मध्ये सत्तेत येण्यासाठी 'आम्ही सत्तेत आलो तर आरक्षण देऊ' अस जनतेला त्यांनी सांगितलं होत. गेली दहा वर्ष केंद्रात आणि राज्यात ते बहुमताने सत्तेत आहेत. मग त्यांनी आरक्षण का दिले नाही, हा खरा प्रश्न आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्यासारखा सामान्य कार्यकर्ता कोट्यवधी लोकाचां मेळावा करू शकतो. यावरून सरकारबाबत जनतेत किती चीड आहे, हे दिसून येते. भाजपाने तातडीने आरक्षण प्रश्न सोडविला पाहिजे. यातून त्यांनी जो वाद उभा केला आहे, त्याचा आम्ही निषेध असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण केला जात असून तो थांबवला पाहिजे, असही नाना पटोले यांनी सांगत भाजपावर टीका केली आहे. 


भाजपाला आरक्षण संपुष्ठात आणायचं... 


तसेच ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी जात निहाय जनगणना मांडली ती महत्वाची आहे. या जात निहाय जन गणनेतून सर्व प्रश्न सुटू शकतात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब एक जात आणि श्रीमंत एक जात अस सांगत विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचाच अर्थ भाजपाला आरक्षण संपुष्ठात आणायचं आहे, हे यातून दिसत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. भाजपने या विषयावर आपली स्पष्टता दिली दिली पाहिजे आणि आरक्षण प्रश्न सोडविला पाहिजे, अस ही पटोले यांनी म्हटल आहे. महाराष्ट्र मध्ये अनेक प्रश्न आहे, दुष्काळ आहे,हे सरकार जीवघेणे आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात देशात महागाई, बेरोजगारी असून या प्रश्नाकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे ते म्हणाले. 


 


इतर महत्वाची बातमी : 


PM Modi in Maharashtra : मुंबईतील हिरे उद्योगासह उर्वरित उद्योगही गुजरातला नेण्यासाठी मोदी महाराष्ट्रात; काँग्रेसचे टीकास्त्र