जळगाव : जळगावमधील (Jalgaon) राजमल लखीचंद परिवाराची एकशे पासष्ट वर्षांची सोने व्यवसायाची परंपरा आहे. मात्र ईडीच्या (ED) कारवाईमुळे आरएल परिवार अडचणीत सापडला आहे, मात्र लवकरच यातून बाहेर पडेल, असा विश्वास आहे. सोन्याचा व्यवसाय करताना व्यापारी प्रामाणिकपणे काम करत असला तरी कधी कधी काम करताना चुका होतात, त्याचा फटका व्यापार करताना बसतो, अशी खंत जळगावच्या सोने व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. 


जळगाव येथील प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सवर (Rajmal Jwellers) ईडीने छापेमारी केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) खळबळ उडाली. तब्बल 45 तास चौकशी करण्यात आली. तीन दिवसांच्या छाप्यांमध्ये 24.7 कोटी रुपयांचे 39.33 किलो सोने आणि हिऱ्यांचे दागिने आणि 1.11 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. यानंतर जळगाव येथील सोने व्यावसायिकांनी या कारवाई आक्षेप घेत ही कारवाई अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त केले आहे. राजमल लखीचंद परिवाराची एकशे पासष्ट वर्षांची सोने व्यवसायाची परंपरा आहे. त्यांनी संपूर्ण देशभर लोकांच्या विश्वास कमावला आहे. त्यांनी काही गैर कृत्य केले असे वाटत नाही, त्यांच्यासोबत झालेली कारवाई दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रिया सराफ असोसिएशनच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. 


जळगावमधील जळगाव जिल्हा सुवर्ण असोसिएशनचे (Saraf Association)  सचिव स्वरूप लुंकड यांनी म्हटलं आहे की, आरएल गृपवर झालेली कारवाई कायद्याला धरुन असायला हवी. आरएल ग्रुपने बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात बँकेने चार टक्के ऐवजी सोळा टक्के व्याज आकारणी केली आणि त्यातून हा वाद निर्माण झाला. या वादातून ईडी किंवा सीबीआयसारख्या यंत्रणा लावण्याऐवजी हा वाद आपसात सोडवायला पाहिजे होता. राजमल लखीचंद परिवाराची एकशे पासष्ट वर्षांची सोने व्यवसायाची परंपरा आहे. मात्र ईडीच्या कारवाईमुळे आर एल परिवार अडचणीत सापडला आहे, मात्र लवकरच यातून बाहेर पडेल, असा विश्वास आहे. सोन्याचा व्यवसाय करताना व्यापारी प्रामाणिकपणे काम करत असला तरी कधी कधी काम करताना चुका होतात, त्याचा फटका व्यापार करताना बसतो, अशी खंत जळगावच्या सोने व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. 
   
या घटनेत आरएल (R L Jwellers) ज्वेलर्सबाबत सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीसारख्या यंत्रणा वापरल्या गेल्या, हे व्हायला नको होते. त्यांच्या या कारवाईनंतर ज्वेलर्समधील सगळा माल घेऊन गेल्याने जळगाव सुवर्ण नगरीत एखाद्या दुकानातून संपूर्ण माल घेऊन जाणे ही कारवाई शंभर टक्के अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया स्वरूप लूंकड यांनी दिली आहे. व्यापारी म्हणून याकडे पाहिले की ईडीने केलेली कारवाईमध्ये संपूर्ण माल घेऊन जाणे. ज्या फर्मशी वाद आहे, ती फर्म सोडून दुसऱ्या फर्मचा माल जप्त करून घेऊन जाणे, त्यांचा व्यवसाय ठप्प करणे, हे दंडूकशाही आणि अन्यायकारक आहे. या कारवाईमुळे त्यांच्यावर अवलंबून असलेले अडीचशे कर्मचारी व्यवसायावर अवलंबून आहे. त्यांचा जगण्याचा प्रश्न या कारवाईने निर्माण झाला आहे. यामध्ये कायदेशीररित्या यांची चूक असेल तर कायद्याप्रमाणे कारवाई व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया सराफ असोसिएशनचे विजय वर्मा यांनी दिली. 


 1.11 कोटी रुपयांची रक्कम जप्त


ईडीने केलेल्या कारवाईत राजमल लखीचंद ग्रुपच्या 60 मालमत्तेचा तपशील हाती लागला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने जळगाव, नाशिक आणि ठाण्यात 13 ठिकाणी शोधमोहीम राबवली. अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या तीन दिवसात मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय ईश्वरलाल जैन आणि त्याचा साथीदारांच्या जवळपास 13 ठिकाणांची झडती घेतली. ईडीने गेल्या तीन दिवसांत टाकलेल्या छाप्यांमध्ये 24.7 कोटी रुपयांचे 39.33 किलो सोने आणि हिऱ्यांचे दागिने आणि 1.11 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. त्याशिवाय, ईडीला काही महत्त्वाच्या गोष्टी आढळून आल्या आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


ED Raid : आर एल ज्वेलर्सवर कारवाई, जळगावसह 13 ठिकाणी छापे; ईडीला काय सापडले?