Jalgaon : नेपाळमध्ये अपघातात मृत्यू झालेल्या 26 जणांचे मृतदेह जळगाव विमानतळावर दाखल झाले आहेत. वायुसेनेच्या विमानाने मृतदेह विमानतळावर दाखल झाले आहेत. विमानतळावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू झालीये. थोड्याच वेळात मृतदेह घेवून 26 अँब्युलन्सने वरणगावकडे होणार रवाना होणार आहेत. नेपाळ येथील काठमांडू येथे जात असताना भाविकांचा बस नदीत कोसळून मृत्यू  झाला होता. 






नेपाळ बस अपघातामधील सत्तावीस पैकी जळगावमधील पंचवीस मृतदेह  हे भारतीय वायू सेनेच्या विमानाने आणण्यात आले आहेत. उर्वरित दोन मृतदेह हे उत्तर प्रदेशातील असल्याने ते त्या ठिकाणी उतरवण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्यातील मृत देहांसाठी पंचवीस स्वतंत्र अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे.  नातेवाईकांसोबत हे मृतदेह त्यांच्या घराचापर्यंत सोडण्यात येणार आहेत.


काठमांडू येथे जात असताना ही बस दरीत कोसळली होती


देवदर्शनासाठी भाविक नेपाळ येथील काठमांडू येथे जात असताना ही बस दरीत कोसळली होती. त्या भाविकांचा बस अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह हे जळगाव विमानतळ येथे दाखल होणार होते. हे मृतदेह आणण्यासाठी  26 ॲम्बुलन्सचा ताफा दाखल झाला होता.  त्यांच्यासोबत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे , आमदार संजय सावकारे हे देखील आहेत. हे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 






रक्षा खडसे ट्वीटमध्ये काय काय म्हणाल्या? 


नेपाळ मध्ये झालेल्या दुर्दैवी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या जळगांव जिल्ह्यातील 25 नागरिकांचे पार्थिव घेऊन भारतीय वायु दलाच्या विमानाने आज सायंकाळी 7.00 वा. पर्यंत जळगाव विमानतळ येथे पोहचणार आहेत. सर्वांनी शोकाकुल कुटुंबीयांना सहकार्य करावे आणि कोणतीही गैरसोय होऊ देऊ नये ही विनंती, असं रक्षा खडसे म्हणाल्या होत्या. 


इतर महत्वाच्या बातम्या 


यापुढे महायुती राहील की नाही याबाबत मी बोलणार नाही, पण शिवसेनेसोबत RPI कायम असेल, आमदार योगेश कदमांच्या वक्तव्याने खळबळ