जळगाव: जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे एक विकृत प्रकार समोर आला आहे, एका हैवानाने कुत्र्याला बेदम मारहाण करत ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दोरीने बांधून फाशी देऊन मारल्याचा अत्यंत विकृत प्रकार घडला आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर प्राणी मित्रांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
 
पारोळा तालुक्यातील बहादरपूर गावी संशयित आरोपी दिलीप भिमराव पारधी याने गावातील मोकाट फिरणाऱ्या काळ्या रंगाच्या कुत्र्यास बेदम मारहाण केली. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरील लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने लटकवून त्यांनी कुत्र्याला फाशी दिली आहे. यानंतर कुत्र्याला ट्रॅक्टरला बांधून ओढत फरफतट नेत नाल्यात फेकून दिल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे.


रोज ट्रॅक्टरखाली हा कुत्रा बसो आणि त्याने ट्रॅक्टरचं सीट फाडलं, या रागातून दिलीप पारधी याने हा प्रकार केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


एक वर्षापूर्वी पुण्यात हैवानाकडून मुक्या जनावरांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार


पुण्यात एक वर्षापूर्वी कुत्र्यापाठोपाठ वासराशी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. डेक्कन जिमखाना परिसरात एका 35 वर्षीय व्यक्तीने हे कृत्य केलं होतं.  काही वाटसरुंनी हा प्रकार पाहिल्यावर घटनास्थळावरुन आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी त्या आरोपीचा पाठलाग केला आणि त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत आरोपी बेशुद्ध पडला. आरोपी बरा झाल्यावर त्याला अटक करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं.


आरोपीने म्हशीवर एका अंधाऱ्या, निर्जन ठिकाणी झाडाला बांधून लैंगिक अत्याचार केले होते. काही वाटसरूंनी म्हशीच्या रेडक्याचा रडण्याचा आवाज ऐकून त्याला पकडलं. या प्रकरणी एका 28 वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली. तक्रारदार व्यक्ती नदीपात्रातील एका हॉटेलमध्ये कॉफी घेत होता. त्यावेळी त्याला एका अज्ञात व्यक्तीने नदीपात्रात म्हशीच्या रेडक्यासोबत अनैसर्गिक प्रकार घडत असल्याचं सांगितलं. त्यावेळी काही जणांनी या व्यक्तीला अनैसर्गिक कृत्य करताना पाहिलं. त्याचा पाठलाग करुन त्याला बेदम मारहाण केली आणि डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नदीपात्रात ज्या पुलाखाली ही घटना घडली, त्या ठिकाणी अंधार असतो आणि तिथे पथदिवे नाहीत.


हेही वाचा:


Navi Mumbai: घरी सीबीआयची छापेमारी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संपवलं जीवन; सीबीआय चौकशीला कंटाळून कस्टमच्या अधिकाऱ्याची आत्महत्या