Eknath Khadse on Ajit Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीत (Mahayuti) जागा वातावरून वाटाघाटी सुरु आहे. महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला तीन ते चार जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) टोला लगावला आहे.
राज्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. या पार्श्वभूमीवर आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. केंद्रीय मंत्री अमित शाहांच्या (Amit Shah) उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राज्यातील जागावाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकनाथ खडसेंना अजित पवारांना टोला
एकनाथ खडसे म्हणाले की, शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत असताना अजित पवार (Ajit Pawar) यांना जी सन्मानाची वागणूक होती. तो सन्मान अजित पवार (Ajit Pawar) यांनी हरवला आहे. आज अजित दादांकडे 50 हून अधिक आमदार आहेत. 50 आमदार आणि स्वतः उपमुख्यमंत्री असतानाही अजित दादांना त्यांच्या बायकोसहित तीन जागांवर समाधान मानावे लागत आहे. मला वाटतं हे चित्र बरोबर नाही, असा टोला एकनाथ खडसेंनी अजित पवारांना लगावला आहे.
भाजपची दुसरी यादी आज जाहीर होणार?
भाजपने या आधी 195 जणांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली होती. त्यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव नव्हते. त्यानंतर आता दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत राज्यातील 25 जणांच्या उमेवारीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिंदे गटाच्या काही खासदारांचा पत्ता कट?
दरम्यान, भाजपकडून शिंदे गटाच्या काही विद्यमान खासदारांना तिकीट देऊ नये अशी सूचना करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामध्ये हातकणंगलेचे धैर्यशील माने, हिंगोलीचे हेमंत पाटील, वाशिम-यवतमाळच्या भावना गवळी, उत्तर पश्चिमचे गजानन कीर्तिकर यांच्यासह इतर दोन खासदारांची नावे असल्याचे समजते. तर नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार,जालन्यातून रावसाहेब दानवे, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, दिंडोरीतून केंद्रीय मंत्री भारती पवार, आणि भिवंडीतून कपिल पाटील यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी वाचा
Congress Lok sabha List: इकडे मविआच्या वाटाघाटी सुरु, तिकडे काँग्रेसकडून 43 उमेदवारांची यादी जाहीर