Jalgaon News जळगाव : त्यांच्या खात्यात शस्त्र आहेत. तशीच आमच्या खात्यातही आहेत. योग्य वेळ आल्यास जशास तसे उत्तर देण्याची आपली तयारी असल्याचं सांगत आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भाजप खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना आव्हान दिले आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात (Raver Lok Sabha Constituency) रक्षा खडसे आमदार चंद्रकांत पाटील यांची नाराजी कशी दूर करणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 


रावेर लोकसभा मतदारसंघात युतीचे घटक पक्ष असलेल्या आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजप उमेदवार रक्षा पाटील यांच्याधील वाद काही केल्या कमी होताना दिसत नाही. त्यांच्या कडे जशी शस्त्र आहेत. तशीच शस्त्र आमच्याकडे देखील असल्याची तिखट प्रतिक्रिया आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिल्याने रावेर मतदारसंघात महायुतीमधील आमदार, खासदार यांच्यातील दुरावा चर्चेचा विषय बनला आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यामधील राजकीय संघर्ष गेल्या तीस वर्षांपासून सुरु आहे. त्यात त्यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांचा देखील समावेश राहिला आहे. चंद्रकांत पाटील आणि रक्षा खडसे हे दोन्ही नेते महायुतीचे सदस्य राहिले असेल तरी नेहमीच ते एकमेकांच्या विरोधातच असल्याचं पाहायला मिळाले आहे. 


जशास तसे उत्तर दिले जाईल 


मागील काळात शेतकऱ्यांना केळी पीक विमा मिळण्यात आमदार चंद्रकांत पाटील यांची आडकाठी आणल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता.रक्षा खडसेंनी या आरोपांचे समर्थन केले होते. आपण कधीही रक्षा खडसे यांच्यावर व्यक्तिगत टीका केली नसताना त्यांनी आपल्यावर केली असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे त्या जशा प्रकारे वागल्या असतील तशाच पद्धतीने त्यांना उत्तर दिले जाईल. जशी त्यांच्या खात्यात शस्त्र आहेत तशीच आमच्या खात्यात देखील शस्त्र असल्याचं सांगत आमदार चंद्रकांत पाटील यांनी रक्षा खडसे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. 


युतीमधील वरिष्ठ नेत्यांचा आदेश पाळणे गरजेचे - रक्षा खडसे 


चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर रक्षा खडसे यांनी म्हटल आहे की, चंद्रकांत पाटील हे महायुतीचे सदस्य असल्याने महायुतीच्या नेत्यांनी त्यांना काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही निवडणूक केवळ रक्षा खडसे यांची नसून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यावेळी पंतप्रधान करण्यासाठीची आहे. त्यामुळे युतीमधील वरिष्ठ नेत्यांचा आदेश पाळणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Rohini Khadse : रावेर लोकसभेची चुरस आणखी वाढणार, नणंद करणार भावजय विरोधात प्रचार