Jalgaon Train Accident: जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक परधाडे रेल्वे स्थानकावर झालेल्या पुष्पक एक्स्प्रेस रेल्वेच्या (Pushpak Train Accident) भीषण अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर मृतांचे मृतदेह हे जिल्हा रुग्णालयात हलवून मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर प्रशासनाच्यावतीने मृतांच्या नातेवाईकांना मृत्यू प्रमाणपत्र देऊन मृतदेह ताब्यात देण्यात आला असून अद्यावत रुग्णवाहिकेद्वारे काही मृतदेह हे जिल्हा रुग्णालयातून नातेवाईकांसह रवाना करण्यात आले आहे.


संकटमोचक मदतीला धावले-


जळगाव जिल्ह्यात पुष्पक एक्स्प्रेस अपघातात नेपाळमधील काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्यानंतर मृतदेह नेपाळमध्ये नेण्याचे मोठे आव्हान या प्रवाशांच्या नातेवाईक यांच्या पुढे होते. मात्र मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या जीएम फाऊंडेशनकडून मृतदेह नेपाळमध्ये नेण्यासाठी अँब्युलन्स  उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर नेपाळमधील मृतकांच्या नातेवाईकानी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह पोलीस पत्रकार आणि जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.


नेपाळमधील मृत कुटुंबीयांनी केली होती मागणी-


नेपाळमधील कमला भंडारी या पुष्पक एक्सप्रेसने मुंबईकडे जात असताना झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांचा मुलगा तपेंद्र आणि सून दोघेही घटनास्थळी दाखल झाले होते .आपल्या आईची अस्थी आणि कपडे घेऊन भारत सरकारने मृतदेह नेपाळपर्यंत पोहोचवण्याची सुविधा करून द्यावी अशी मागणी त्यांनी केली होती .


मृतांची नावे पुढीलप्रमाणे : 


1. कमला नवीन भंडारी (43, नेपाळ, हल्ली मुक्काम कुलाबा ), 


2. लच्छीराम खमू पासी (40, नेपाळ) 


3. इम्तियाज अली (35, उत्तरप्रदेश) 


4. नसरुद्दीन बद्रुद्दीन सिद्दीकी (19, उत्तरप्रदेश) 


5. जवकला भटे जयकडी (80, नेपाळ) 


6. हिनू नंदराम विश्वकर्मा (10, नेपाळ) 


7. बाबू खान (27 वर्षे, उत्तरप्रदेश)


जखमींची नावे पुढीलप्रमाणे : 


1. अबू मोहम्मद (30, तालबाघौडा, जि. श्रावस्ती, उत्तर प्रदेश)


2. हकीम अन्सारी (45, तिलवार रतनपूर, जि. श्रावस्थी, उत्तर प्रदेश)


3. हसन अली (19, गिलोला, जि. बहराइच, उत्तर प्रदेश)


4. विजयकुमार गौतम (33, बेलपूर बगई, जि. बहराइच, उत्तर प्रदेश)


5. उत्तम हरजन (25, बेलपूर बगई, जि. बहराइच, उत्तर प्रदेश)


6. मोहम्मद निब्बर (31, डिकौली, जि. श्रावस्थी, उत्तर प्रदेश)


7. उजाला सावंत (38, अछाम, जि. मंगलसेन, नेपाळ)


8. दिपक थापा (18, दुल्लू (नगरपालिका) जि. दहिलोक, नेपाळ)


9. धर्म बहादूर सावंत (8, अछाम, जिल्हा. मंगलसेन, नेपाळ)


10. मंजू परिहार (25, दुल्लू (नगरपालिका) जि. दहिलोक, नेपाळ)


संबंधित बातमी:


Jalgaon Train Accident: ट्रेनमधील चहा विक्रेत्याचं एक वाक्य अन् होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताबाबत धक्कादायक माहिती


नेपाळचं कुटुंब अस्थी घेण्यासाठी रेल्वे रुळावर पोहचलं; एकाचं फक्त शिर मिळालं, जळगावमध्ये काय घडतंय?