Jalgaon Train Accident जळगाव: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात बुधवारी (22जानेवारी) सायंकाळी परधाडे रेल्वे स्थानकाजवळ (Jalgaon Train Accident) घडलेल्या भयंकर अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला असून एकूण 25 प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच या अपघातामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कारण अजूनही अनेक प्रवाशी बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. 


जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आतापर्यंत सात मृतांचं शवविच्छेदन झालेलं आहे. या सर्व मृतदेहांवर रासायनिक प्रक्रिया करून मृतदेह पोलिसांच्या स्वाधीन केले जातील आणि त्यानंतर ते नातेवाईकांना सुपूर्द करतील. अनेक मृतदेह दूरचे असल्याने जवळपास पाच ते सहा दिवस त्यांच्या गावी जाण्यासाठी लागू शकतात. त्यामुळे सर्व मृतदेहांवर रासायनिक प्रक्रिया करूनच मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात येतील.  तर अपघातातील एका प्रवाशाचे केवळ शिर मिळून आले, मात्र धड अद्याप मिळालेले नाही. त्याच्या धडाचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांनी श्वान पथकाची मदत घेऊन घटनास्थळी शोध घेण्याचं काम सुरू केले आहे.


नेपाळचं कुटुंब अस्थी घेण्यासाठी घटनास्थळी-


जळगावमधील रेल्वे अपघातामध्ये नेपाळमधील कमला भंडारी या महिलेचा देखील मृत्यू झाला. कमला भंडारी यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्यांचा मुलगा तपेंद्रा आणि सून हे दोघेही घटनास्थळी येऊन त्यांनी अस्थी आणि मयत आईचे कपडे घेऊन गेले आहेत. भारत सरकारने मृतदेह नेपाळपर्यंत पोहचवण्याची सुविधा करून द्यावी, अशी मागणी ही कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, कमला भंडारी यांच्यासोबत त्यांच्या सून होत्या. अपघात झाल्यानंतर घटनास्थळावर सासू कमला भंडारी यांना सावरताना चोरट्यांनी त्यांचा मोबाइल, पर्स व त्यातील पैसे चोरून नेले. याशिवाय अनेक प्रवाशांचे पैसे व बॅगा लांबविण्यात आल्याचे सांगण्यात आल्याची माहिती समोर आली. 


मृतांची नावे पुढीलप्रमाणे : 


1. कमला नवीन भंडारी (43, नेपाळ, हल्ली मुक्काम कुलाबा ), 


2. लच्छीराम खमू पासी (40, नेपाळ) 


3. इम्तियाज अली (35, उत्तरप्रदेश) 


4. नसरुद्दीन बद्रुद्दीन सिद्दीकी (19, उत्तरप्रदेश) 


5. जवकला भटे जयकडी (80, नेपाळ) 


6. हिनू नंदराम विश्वकर्मा (10, नेपाळ) 


7. बाबू खान (27 वर्षे, उत्तरप्रदेश)


जखमींची नावे पुढीलप्रमाणे : 


1. अबू मोहम्मद (30, तालबाघौडा, जि. श्रावस्ती, उत्तर प्रदेश)


2. हकीम अन्सारी (45, तिलवार रतनपूर, जि. श्रावस्थी, उत्तर प्रदेश)


3. हसन अली (19, गिलोला, जि. बहराइच, उत्तर प्रदेश)


4. विजयकुमार गौतम (33, बेलपूर बगई, जि. बहराइच, उत्तर प्रदेश)


5. उत्तम हरजन (25, बेलपूर बगई, जि. बहराइच, उत्तर प्रदेश)


6. मोहम्मद निब्बर (31, डिकौली, जि. श्रावस्थी, उत्तर प्रदेश)


7. उजाला सावंत (38, अछाम, जि. मंगलसेन, नेपाळ)


8. दिपक थापा (18, दुल्लू (नगरपालिका) जि. दहिलोक, नेपाळ)


9. धर्म बहादूर सावंत (8, अछाम, जिल्हा. मंगलसेन, नेपाळ)


10. मंजू परिहार (25, दुल्लू (नगरपालिका) जि. दहिलोक, नेपाळ)




संबंधित बातमी:


Jalgaon Train Accident: सून मृत सासूला सावरत असताना चोरट्यांची हातसफाई; जळगावमध्ये नेपाळच्या महिलेसोबत काय घडलं?