Jalgaon Train Accident जळगाव: जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ (Jalgaon Train Accident) काल सायंकाळी (22 जानेवारी) झालेल्या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत 13 रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला असून हे सर्व प्रवाशी पुष्पक एक्सप्रेसमधील (Pushpak Express Accident) होते. या अपघातात एकूण 25 प्रवाशी जखमी झालेले असून त्यांच्यावर पाचोरा आणि जळगाव येथील विविध रुग्णालयात उपचार सुरू असून त्या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे.
रात्री उशिरापर्यंत या अपघातात मृत्यू झालेल्या सर्व प्रवाशांचे शव विच्छेदन करण्यात आलं असून आज सकाळी मृत्यू झालेल्या सर्वांचे शव त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात येणार आहे. तर काही शव हे नेण्यापलिकडे असल्याने त्यांच्येवर त्यांचे नातेवाईक आल्यावर जळगाव येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. मृत्युमुखी पडलेले सर्व प्रवाशी हे उत्तर भारतातील आहेत तर तीन जण नेपाळमधील आहे.
...अन् होत्याचे नव्हते झाले-
आग लागल्याची अफवा पसरल्याने भीतीपोटी पुष्पक एक्स्प्रेसमधून काही प्रवाशांनी उड्या मारल्या. मात्र बाजूने जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसच्या धडकेत प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघाताबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. गाडीतील प्रवाशांना एका चहा विक्रेत्याने आग लागल्याची माहिती दिली आणि प्रवाशांचा धीर सुटला. त्यामुळे प्रवाशांनी घाबरून परधाडे माहेजीदरम्यान भरधाव रेल्वेतून उड्या मारल्या. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले, अशी माहिती पुष्पक ट्रेनमधील जखमी प्रवाशांनी दिली.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
सदर घटनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली. जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ संध्याकाळी झालेल्या दुर्घटनेची माहिती आताच मी प्रशासनाकडून घेतली आहे. आग लागल्याची अफवा पसरल्याने पुष्पक एक्सप्रेस मधून काही प्रवाशांनी शेजारच्या रुळावर उड्या मारल्यामुळे सदर दुर्घटना घडली आहे अशी प्राथमिक माहिती मिळते. रेल्वेचे अधिकारी आणि त्यांची बचाव पथके देखील घटनास्थळी पोहचत आहेत. नक्की किती प्रवासी जखमी आहेत आणि मरण पावले आहेत याविषयी अद्याप आकडेवारी हाती आलेली नाही. मात्र तातडीने बचाव पथकांनी जखमींना रुग्णालयात हलवावे आणि योग्य ते उपचार करावेत अशा सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
पुष्पक एक्सप्रेसमध्ये काय घडलं? प्रत्यक्ष दर्शी प्रवाशांनी सगळं सांगितलं, VIDEO:
संबंधित बातमी:
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार?