बुलढाणा : भारताच्या संविधानाचा आज अमृत महोत्सवी वर्ष आहे. माझं ही अमृत महोत्सवी वर्ष आहे. आज अनेक जण हातात सोन्या चांदीचे चमचे घेऊन जन्माला आले, मात्र मी संविधान घेऊन जन्माला आलोय. जो मोठं लग्न करेन, लग्नात खर्च करेन, भटजींना दक्षणा देईल, त्याच्या लग्नात जाऊ नये अशी भूमिका घेण्याची वेळ आली आहे. ज्याच्याकडे अतिरिक्त काळा पैसा आहे अशा लोकांनी समाज बिघडवला आहे. कुठल्याही पक्षात रहा पण जुन्या परंपरा रूढी बंद करा. एका ताटात जेवणारे आम्ही लोक होतो. यात विष कुणी कालवलं, याचा शोध घेणे गरजेचे आहे. कुणीतरी जतिजातीत विष पेरत आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावं. आपल्यापैकी कुणी राष्ट्रपती, पंतप्रधान झाल तरी मराठा समजाचं एका रात्रीतून बरं होणार नाही. असे मत मराठा सेवा संघाचे प्रमुख पुरुषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar) यांनी व्यक्त केलं आहे.
आज सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊंचा 427 वा जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त मराठा सेवा संघाने ही जिजाऊ सृष्टी येथे मोठ्या प्रमाणात जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला. याच कार्यक्रमात मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचा अमृत महोत्सव ही साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना पुरुषोत्तम खेडेकर यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
दुर्दैवाने आमचा मराठा समाज देणारा नाही तर घेणारा होत चाललाय- पुरुषोत्तम खेडेकर
आज तुम्हाला आरक्षण मिळालं तरी तुम्हाला उद्याच नोकरी मिळेल अस नाही. अनेक छोटे-छोटे समाज आपल्या कर्तृत्वावर मोठे झाले आहेत. हे श्रीमंत लोक अगदी साधं लग्न करतात. आपल्यात (मराठा समाजात) जो माज आहे तो संपवण्याची जवाबदारी मराठा सेवा संघाने घ्यावी. आपल्या कुटुंबातील मुली-मुलांना या सगळ्या गोष्टी शिकविण्याची वेळ आली आहे. मराठा हा व्यापक शब्द असला तरी प्रत्येकाने स्वतः हून उभ राहणे शिका. कुणीतरी येईल आणि तुमचं कल्याण करेल ते दिवस आता संपले आहेत. आपण म्हणतो की आम्ही सहा कोटी आहोत. दररोज तुम्ही एक रुपया जमा केला तर दररोज सहा कोटी आणि महिन्याला 1800 कोटी जमा होतील. मात्र दुर्दैवाने आमचा मराठा समाज देणारा नाही तर घेणारा होत चालला आहे. पुढच्या वर्षीच्या म्हणजे 2 2026चा जिजाऊ जन्मोत्सव फक्त महिलांनी साजरा करायचा आहे. यासाठी तयार रहा. असे आवाहन ही पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले आहे.
2026 चा जिजाऊ जन्मोत्सव हा महिलांनी महिलांसाठी साजरा करावा
पुढे बोलताना पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले की, समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा या आता नष्ट करण्याची वेळ आली आहे. यावेळी त्यांनी मराठा समाजातील अनेक अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरांचा उल्लेख केला आणि त्यामुळे सर्वांनी समोर आलं पाहिजे. यासोबतच त्यांनी 2026चा जिजाऊ जन्मोत्सव हा महिलांनी महिलांसाठी साजरा करण्याचं आवाहनही केलं. यावेळी मंचकावर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हे ही वाचा