SRH vs RCB , IPL 2021 : विराटसेनेच्या बंगळूरुने हैदराबादवर सहा धावांनी मात केली आहे. ग्लेन मॅक्सवेलच्या झुंझार अर्धशतकाच्या बळावर बंगळुरुनं 20 षटकात 8 बाद 150 धावा केल्या होत्या. मात्र हैदराबादला बंगळुरुच्या गोलंदाजांच्या माऱ्यासमोर 143 धावांपर्यंत मजल मारता आली.
बंगळुरू आणि हैदराबादमधील आयपीएल सामन्यात हैदराबादनं बंगळुरुला 149 धावांवर रोखले. ग्लेन मॅक्सवेलच्या झुंझार अर्धशतकाच्या बळावर बंगळुरुनं 20 षटकात 8 बाद 149 धावा केल्या. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे हैदराबादने बंगळुरूला दीडशेच्या आत रोखले.
सलामीला विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल आले होते. तिसऱ्याच षटकात भुवनेश्वरने पडीक्कलला 11 धावांवर बाद केले. त्यानंतर आलेला शाहबाझ अहमदही 14 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेलने बंगळुरूला सावरले. यानंतर जेसन होल्डरने विराटला 33 धावांवर बाद केले. त्यानंतर मागच्या सामन्याचा शिल्पकार एबी डिव्हिलियर्स केवळ एका धावेवर बाद झाला.
यानंतर आलेल्या वॉशिंग्टन सुंदर(8) आणि डॅनियल ख्रिश्चन (1) यांनाही मोठी खेळी करता आली नाही. एकीकडे विकेट पडत असताना ग्लेन मॅक्सवेलने 5 चौकार आणि 3 षटकारांसह 59 धावांची खेळी केली. हैदराबादकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर राशिद खानने 2 विकेट घेतल्या.