माउंट मैंगनुई : टीम इंडियानं न्यूझीलंडविरुद्धची अखेरची ट्वेन्टी ट्वेन्टी जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत 5-0 असं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या सामन्यात टीम इंडियानं न्यूझीलंडसमोर 164 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ धावाच करु शकला. रॉस टेलर आणि टीम सीफर्टनं अर्धशतकं झळकावून न्यूझीलंडच्या विजयासाठी झुंज दिली. पण टीम इंडियाच्या प्रभावी आक्रमणासमोर त्यांचे हे प्रयत्न अपुरे ठरले.


टीम इंडियाने पहिला परदेश दौरा खेळणाऱ्या भारतीय संघाने इतिहासाची नोंद केली करत मालिकेत न्यूझीलंडचा सुफडासाफ केला. न्यूझीलंडच्या भूमीवर अशी कामगिरी करण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ ठरली. टीम इंडियाच्या 164 धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या न्यूझीलंडचे आघाडीचे 3 फलंदाज अवघ्या 17 धावांत माघारी परतले. मात्र यानंतर टीम सेफर्ट आणि रॉस टेलर यांनी चौथ्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी रचत सामना फिरवला.

टीम इंडियाचा सलग चौथा 'सुप्पर' विजय, शार्दुल ठाकूर, लोकेश राहुलची जिगरबाज खेळी

शिवम दुबेच्या एका षटकात या दोन्ही फलंदाजांनी 34 धावा कुटल्या. मात्र नवदीप सैनीने सेफर्टला माघारी धाडले. यानंतर न्यूझीलंडच्या संघाची उतरती कळा सुरु झाली. टेलरने एका बाजूने बाजू सांभाळत आपलं अर्धशतक झळकावलं. मात्र त्यालाही सैनीने बाद केलं. इश सोधीने शार्दुल ठाकूरच्या अखेरच्या षटकात दोन षटकार खेचत सामन्यात रंगत आणली. मात्र, तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. 163  धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 156 धावाच करु शकला. भारताकडून जसप्रीत बुमराहने 3, नवदीप सैनी-शार्दुल ठाकूरने प्रत्येकी 2-2 तर वॉशिंग्टन सुंदरने एक विकेट घेतली.

टीम इंडियाला धक्का, अष्टपैलू हार्दिक पंड्याची न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार



त्याआधी रोहित शर्मा आणि लोकेश राहुलच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियानं 20 षटकांत तीन बाद 163 धावांची मजल मारली. रोहितनं खणखणीत अर्धशतक झळकावताना तीन चौकार आणि तीन षटकारांसह 60 धावांची खेळी केली. लोकेश राहुल आणि रोहित शर्मा खेळत असताना टीम इंडिया मोठी धावसंख्या उभारेल असे चित्र होते. मात्र राहुल 45 धावांवर बाद झाला. नंतर रोहित शर्माने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र 60 धावांवर खेळत असताना रोहित शर्माच्या पोटरीचे स्नायु दुखावल्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. न्यूझीलंडकडून कुगलेजनने 2 तर हमिश बेनेटने एक विकेट घेतली.