नवी दिल्ली: नव्या 66,732 रुग्णांसह भारताची एकूण कोरोना रुग्ण संख्या 71 लाखांवर पोहचली आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही 61 लाख इतकी झाली असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण हे 86.36 टक्के इतके झाले आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आणि त्याचा दर हा सातत्याने वाढत आहे.


ताज्या आकडेवारी नुसार देशातील कोरोना रुग्णांची संख्या ही 71,20,538 इतकी झाली आहे तर मृतांची संख्या ही 1,09,150 वर पोहोचली आहे.


अॅक्टिव रुग्णांची संख्या ही 8,61,853 इतकी झाली असून त्याचे एकूण रुग्णसंख्येशी प्रमाण हे 12.10 टक्के इतके आहे. सलग चौथ्या दिवशी देशात अॅक्टिव रुग्णांची संख्या ही 9 लाखांपेक्षा कमी आहे. देशात गेल्या चोविस तासात 816 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचे प्रमाण हे 1.53 टक्के आहे.


आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात कोरोना रुग्णांची संख्येने 7 ऑगस्ट रोजी 20 लाखांचा टप्पा ओलांडला तर 23 ऑगस्ट रोजी 30 लाखांचा टप्पा ओलांडला. 5 सप्टेंबर रोजी ती संख्या 40 लाख तर 16 सप्टेंबरला 50लाख तर 28 सप्टेंबर रोजी कोरोना रुग्णांच्या संखेने 60 लाखांचा टप्पा ओलांडला आणि आज ही संख्या 71 लाखांवर गेली आहे.


ICMR च्या मते देशात आतापर्यंत 8,78,72,093 इतक्या कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी रविवारी 9,94,851 इतक्या चाचण्या करण्यात आल्या.


मृतांमध्ये 309 मृत हे महाराष्ट्रात तर 75 कर्नाटक आणि 65 तामिळनाडूत झाले आहेत. एकूण मृतांच्या संख्येतही महाराष्ट्र आघाडीवर आहे. राज्यात आतापर्यंत 40,349 रुग्णांचा मृत्यू झाले आहेत तर त्या खालोखाल 10,252 मृत हे तामिळनाडूतील आहेत.


कोरोनाच्या संख्येत भारत आता जगात अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये भारत हा अमेरिका आणि ब्राझिल नंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. अॅक्टिव रुग्णांच्या बाबतीत भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशात अॅक्टिव रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र हे राज्य आघाडीवर असून त्या खालोखाल तामिळनाडू, आध्र प्रदेश आणि कर्नाटकचा नंबर लागतो.


 

संबंधीत बातम्या:

'कोरोना पाहुणा पाय पसरतोय, लॉकडाऊन करावा लागेल असं वागू नका' : मुख्यमंत्री ठाकरे


आनंदाची बातमी... कोरोनावरील संभाव्य लस वाटपासाठीची तयारी सुरु


भारताच्या कोरोनाविरोधातील लढ्याला कोविड वॉरियर्सकडून मोठं सामर्थ प्राप्त: नरेंद्र मोदी 


धारावीतील कोरोना प्रसारावरचे नियंत्रण कौतुकास्पद: वर्ल्ड बँक