मुंबई : गुरुवारी केरळमध्ये एका गर्भवती महिलेला झिका व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा झिका व्हायरसचा शिकराव झाला असल्याचं स्पष्ट झालं. संबंधित महिला ही ताप, सर्दी आणि शरीरावर पट्टे उठत असल्याने रुग्णालयात भरती झाली. तिची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तिचे ब्लड सॅम्पल पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्या महिलेला झिका व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. सध्या त्या महिलेने एका बालकाला जन्म दिला असून त्या दोघांचीही प्रकृत्ती उत्तम आहे.  


काय आहे झिका व्हायरस? कसा होतो त्याचा प्रसार? 
झिका व्हायरसचा प्रसार हा एडीस प्रकारचा डास चावल्याने होतो. एडीस प्रकारच्या डासामुळे डेंग्यू, चिकनगुनिया आणि पिवळा ताप असे आजारही होतात. झिका व्हायरसचा प्रसार गर्भवती महिलेला झाल्यास तिच्या गर्भातही या व्हायरसचा प्रसार होण्याची शक्यता असते. त्यामुळे अपत्यामध्ये काहीतरी कमतरता निर्माण होते. या रोगाचा प्रसार साधारणपणे उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय क्षेत्रात होतो. 


एडीस प्रकारातील डास हा शक्यतो सकाळी आणि संध्याकाळी चावतो. सध्या जगातील 86 देशांमध्ये या प्रकाराचे डास आढळतात. 1947 साली आफ्रिकेत या रोगाचा शोध लागाला होता. 


काय आहेत लक्षणं?
ताप येणं, त्वचेवर चट्टे पडणं, सांधेदुखी ही झिका व्हायरसची प्राथमिक लक्षणं आहेत. डोकेदुखी, अस्वस्थता असे लक्षणंही होऊ शकतात. ही लक्षण सामान्यपणे दोन ते सात दिवसांपर्यंत कायम राहतात. सध्या झिका व्हायरसवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतेही औषध वा लस उपलब्ध नाही. 


डास चावण्यापासून संरक्षण करणे हाच सर्वात मोठा उपाय सध्या आपल्याकडे आहे. त्यासाठी आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे किंवा डास होऊ नयेत यासाठी उपाययोजना करणे या गोष्टीमुळे मोठा परिणाम होऊ शकतो.


महत्वाच्या बातम्या : 


Corona Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 43 हजार रुग्णांची भर तर 911 जणांचा मृत्यू
Mumbai Ghatkopar Car : बुडालेल्या कारच्या बदल्यात मिळाली नवी कोरी कार गिफ्ट
Petrol Diesel 9 July : देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वोच्च स्तरावर; आजचे दर काय?