Sansad TV YouTube : व्हिडीओ प्लॅटफॉर्म अ‍ॅप युट्युबने (Youtube) संसद टीव्हीचे चॅनल टर्मिनेट केले आहे. लोकसभा (Lok Sabha) आणि राज्यसभेच्या (Rajya Sabha) कामकाचाचे थेट प्रक्षेपण याच चॅनेलवरून दाखवण्यात येते. यूट्यूब मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं यूट्यूबने सांगितलं आहे. भारत सरकारद्वारे हे चॅनल हाताळले जाते. युट्युबने हे चॅनल टर्मिनेट केल्यानंतर संसद टीव्हीने एक पत्रक जारी केलं आहे. ज्यात म्हटलं गेलं आहे की, चॅनलची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी युट्यूब काम करत आहे. मंगळवारी सकाळी संसद टीव्हीने सर्च केल्यानंतर एरर 404 नोटीफिकेशन दाखवण्यात येत होते. ज्यामध्ये तुम्ही सर्च करत असलेले चॅनल उपलब्ध नसल्याचे दाखवत होते.  

  


चॅनल हॅक झाले होते, संसद टीव्हीचा दावा    


चॅनल टर्मिनेट झाल्यानंतर संसद टीव्हीने पत्रक जारी करत दावा केला आहे की, 15 फेब्रुवारी रोजी रात्री एक वाजता हे चॅनल हॅक झाले होते. हॅकर्सनी या चॅनलचे नाव बदलण्याचा प्रयत्न देखील केला. हॅकर्सनी संसद टीव्हीचे नाव बदलून “Ethereum” केले होते. मात्र संसद टीव्हीच्या सोशल मीडिया टीमने यावर काम करत सकाळी 3.45 वाजता हे चॅनल पुन्हा रिस्टोर केले.          


इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-IN), जी भारतातील सायबर सुरक्षेसाठी नोडल एजन्सी आहे. त्यांनी देखील या प्रकरणाची माहिती देत संसद टीव्हीला सतर्क केले होते. YouTube ने नंतर सुरक्षिततेच्या धोक्यासाठी कायमस्वरूपी निराकरण करण्याचे काम सुरू केले असून चॅनल शक्य तितक्या लवकर रिस्टोर केले जाणार आहे.


हे आहेत युट्यूब मार्गदर्शक तत्त्वे (Youtube Guidelines)


युट्यूबने चॅनेलसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत, ज्यामध्ये कोणत्या प्रकारचा मजकूर पोस्ट करू नये, हे सांगण्यात आले आहे. यामध्ये सर्व प्रकारचे व्हिडीओ, व्हिडीओवरील कमेंट्स, लिंक्स आणि थम्बनेललाही लागू होते. युट्यूबनुसार, ही मार्गदर्शक तत्त्वे सर्व लोकांसाठी समान आहेत. यामध्ये मशिन रिव्हू आणि प्रत्यक्ष पहाणीच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मवरील कंटेट वेळोवेळी तपासला जातो. सर्वांच्या सुरक्षितेसाठी हे नियम बनवण्यात आल्याचे युट्यूबकडून सांगण्यात आले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :