लखनऊ : उत्तर प्रदेशमधील उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेश सरकारने मदत जाहीर केली आहे. शनिवारी या प्रकरणातील पीडितेचा मृत्यू झाला. तिला बलात्कारानंतर जिवंत जाळण्यात आलं होतं, ज्यात तिचं 90 टक्के शरीर भाजलं होतं. पोस्टमॉर्टमत्या रिपोर्टनुसार गंभीररित्या शरीर जाळलं गेल्यानेच तिचा मृत्यू झाला. पीडितेच्या कुटुंबाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 25 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. सोबतच सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या प्रकरणाची सुनवाई फास्ट ट्रॅक कोर्टात होईल असं आश्वासनही दिलंय. तर विरोधकांनी यावर 25 लाखांची मदत न करता 50 लाखांची मदत देण्याची मागणी केली आहे.
तत्पूर्वी, कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य आणि प्रांताचे खासदार साक्षी महाराज यांच्यासमोर घोषणा दिल्या. उत्तर प्रदेशचे कामगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्य, तंत्रशिक्षण मंत्री कमल राणी वरुण आणि खासदार साक्षी महाराज यांनी बिहार पीडितेच्या गावात तिच्या कुटुंबाला भेटायला आले तेव्हा कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचा तीव्र विरोध केला. पोलिसांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्त्यांनी त्यांचाही निषेध केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीच मौर्य आणि कमल राणी वरुण या मंत्र्यांना पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी पाठवलं होतं.
आज जेव्हा उन्नाव प्रकरणातील पीडितेवर अंत्यसंस्कार झाले तेव्हा समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पीडितेच्या परिवाराला 25 ऐवजी 50 लाख रुपयांची मदत आणि आरोपींना फाशी देण्याचीही मागणी केली आहे. समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते शंभरांच्या संख्येत पीडितेच्या गावात पोहोचले आणि त्यांनी ही मागणी केली.
Unnao Case | उन्नाव बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर दिल्लीत संतापाची लाट, इंडिया गेटवर आंदोलक पोलीस आमने-सामने