प्रेमात झाली फसवणूक -
उन्नाव प्रकरणातील पीडितेला गावातीलच शिवम त्रिवेदी या व्यक्तीने आपल्या प्रेमात ओढले. शिवमने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर 2018 मध्ये बलात्कार केला. यादरम्यान याचं व्हिडीओ शुटींग करुन ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले. याच काळात शिवमच्या मित्रानेही त्याला साथ दिली. आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन देऊन विश्वासघात केल्याने पीडितेला याचा मानसिक धक्का बसला.
पोलीसांनी लवकर तक्रार घेतली नसल्याचा आरोप -
ही घटना घडल्यानंतर पीडितेने न्यायासाठी पोलीसांकडे धाव घेतली. मात्र, पोलीसांनी ठाण्याच्या फेऱ्या मारायला लावल्याचा आरोप पीडीतेच्या कुटुंबांकडून करण्यात आला आहे. पोलीसांनी हात वर केल्याने पीडितेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. आरोपींच्या विरोधात केस दाखल झाल्यानंतर पीडितेसह तिच्या कुटुंबाला धकम्या येऊ लागल्या. पीडितेच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की आरोपी जेलमधून सुटून आल्यानंतर त्यांना सतत धमकी देत होता आणि याआधीही त्याने अनेकदा पीडितेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणातील दोन आरोपींपैकी एका आरोपीला 10 दिवसांपूर्वीच जामीन मिळाला होता. दरम्यान, 5 डिसेंबरला पीडितेच्या खटल्याची तारीख रायबरेली कोर्टात होती. याच केसच्या संदर्भात पीडिता सकाळी कोर्टात जात असताना आरोपींनी पीडितेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिवम, त्याचे वडील रामकिशोर, शुभम, हरिशंकर आणि उमेश बाजपेयी यांना अटक केली आहे.
सर्व आरोपी पोलीसांच्या ताब्यात -
पीडितेच्या मृत्यूनंतर सर्व आरोपींना फाशी देण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. या प्रकरणी 5 आरोपींना आधीच अटक करण्यात आली असून एसआयटीकडून तपास सुरु आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडितेला लवकर न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे.
संबंधित बातम्या -
उन्नावच्या निर्भयाची झुंज अपयशी, उपचारादरम्यान दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात अखेरचा श्वास
हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया म्हणतात..
Unnao Rape Case | उन्नावमधल्या बलात्कार पीडित तरुणीचा अखेर मृत्यू | ABP Majha