Vande Bharat Express : सहा दिवसांपूर्वी 30 पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी हिरवा झेंडा दाखवत मोठ्या थाटामाटात गांधीनगर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचं (Vande Bharat Express) उद्घाटन केलं. या सुपरफास्ट वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) चा अपघात झाला आहे. गुजरातच्या वातवा स्टेशनवरुन मणिनगरच्या दिशेने येत असताना वंदे भारत एक्सप्रेस म्हशींच्या कळपाला धडकली. यात एक्सप्रेसचा पुढचा भाग अक्षरश: तुटून पडला आहे. या अपघाताचे व्हिडीओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. वंदे भारत एक्प्रेसच्या इंजिनाच्या भागाचं नुकसान झालं आहे. 


माहितीनुसार वंदे भारत ट्रेन मुंबई सेंट्रलवरुन गुजरातच्या गांधीनगरकडे (Gandhinagar Trains) येत होती. पश्चिमी रेल्वेचे ज्येष्ठ पीआरओ केजे जयंत यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, ही घटना सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली.  यावेळी वंदे भारत ट्रेन वातवा स्टेशनवरुन मणिनगरच्या दिशेने येत होती. त्याचवेळी अचानक म्हशींचा कळप रेल्वे ट्रॅकवर आला आणि ही जोरदार धडक झाली.  






रेल्वेचे पीआरओ प्रदीप शर्मा यांनी सांगितलं की, या घटनेत ट्रेनचं थोडं नुकसान झालं आहे मात्र वाहतुकीला कुठल्याही प्रकारचा अडथळा आलेला नाही. सर्व ट्रेन्स आपल्या निश्चित वेळेमध्ये धावत आहेत.  शर्मा यांनी सांगितले की, ट्रेनचा समोरचा तुटलेला भाग दुरुस्त केला जाईल आणि ही ट्रेन वेळेवर चालवली जाईल. गुजरातमध्ये गायी आणि म्हशीपालन करणाऱ्या लोकांना  वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकाची माहिती नसल्याने म्हशींचे कळप रुळांवर आले. आता त्यांना जागृत करण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे, असं देखील शर्मा यांनी सांगितलं. 
 
भारतातील सर्वात आधुनिक आणि नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह सुसज्ज असलेल्या या वंदे भारत ट्रेनला 30 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या ट्रेनचा वेग ताशी 180 किमी आहे, परंतु सध्या ती 130 किमी प्रतितास वेगाने चालवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 सप्टेंबर रोजी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करत या ट्रेनने त्यांनी गांधीनगर ते अहमदाबाद असा प्रवास केला. देशातील ही तिसरी वंदे भारत ट्रेन आहे. ही ट्रेन गुजरातची राजधानी गांधीनगर येथून अहमदाबाद, सुरत आणि बडोदापर्यंत धावते.






सेकंड जनरेशन वंदे भारत एक्सप्रेसची वैशिष्ट्ये
0 ते 160 kmph फक्त 129 सेकंदात ( आधी 145 सेकंड ) 
रिजेनेरेशन - 35 टक्के ( आधी 29 टक्के ) 
वातानुकूल यंत्रणा - ऊर्जा वाचविणारी vvvf ड्राईव्ह यंत्रणा ( आधी डायरेक्ट ड्राईव्ह )
रुळांवर 650 मिमी पर्यंत पाणी साचले असल्यास गाडी धावू शकेल ( आधी 400 मिमी पर्यंत ) 
बॅटरी बॅक अप - 3 तास ( आधी एक तास )


इतर महत्वाच्या बातम्या


Vande Bharat Express Special Report : गांधीनगर ते मुंबई सेंट्रल धावणारी वंदे भारत एक्सप्रेस कशी आहे?


Vande Bharat Express : PM मोदींनी गांधीनगर-मुंबई 'वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन'ला दाखवला हिरवा झेंडा