नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन (Derek O'Brien) यांच्यावर हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मतदान कार्ड हे आधारला लिंक करण्याच्या मुद्द्यावर राज्यसभेत चर्चा सुरु असताने  खासदार डेरेक ओब्रायन यांनी रुल बूक फेकल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. 


खासदार डेरेक ओब्रायन यांनी रुल बुक फेकल्यानंतर त्यावर भाजपचे नेते भूपेंद्र यादव आणि पियूष गोयल यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री व्ही मुरलीधर यांनी  खासदार डेरेक ओब्रायन यांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव बहुमताने पारित करण्यात आला. 


 






राज्यसभेतील 12 खासदार निलंबित 
ऑगस्ट महिन्यात झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अभूतपूर्व गोंधळ झाला होता. कृषी कायदे, कोरोना परिस्थिती हाताळण्यात आलेले सरकारला अपयश यावरून पावसाळी अधिवेशन वादळी होणार अशी अटकळ बांधली जात होती. राज्यसभेत 11 ऑगस्ट रोजी मार्शल बोलवण्यात आले होते. एका विधेयकाच्या चर्चेदरम्यान हा गोंधळ झाला. यावेळी सुरक्षा रक्षक आणि खासदारांमध्ये वादावादीही झाली होती. या गोंधळाप्रकरणी राज्यसभेतील 12 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. 


निलंबित खासदारांची यादी 
प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना), अनिल देसाई (शिवसेना), इलामाराम करीम (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष), फुलो देवी नेताम (काँग्रेस), छाया वर्मा (काँग्रेस), रिपुन बोरा (काँग्रेस), बिनॉय विश्वम (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), राजमणी पटेल (काँग्रेस), डोला सेन (काँग्रेस), शांता छेत्री (काँग्रेस), सय्यद नासिर हुसेन (काँग्रेस), अखिलेश प्रसाद सिंग (काँग्रेस).


संबंधित बातम्या :