नवी दिल्ली : देशातला लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आल्यानंतर या काळात रेल्वे, विमान सेवाही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. त्यामुळे या सेवा नेमक्या कधी सुरु होणार याबद्दलही चर्चा सुरु आहे. त्यात आज एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीनं 3 मे नंतर काही ठराविक डॉमेस्टिक फ्लाईटचं बुकिंग सुरु केल्याचं म्हटलं आहे. एअर इंडिया वेबसाईटच्या होमपेजवर असा मेसेज आहे. त्यात आंतरराष्ट्रीय सेवेचंही चित्र स्पष्ट होतंय. कारण आंतराराष्ट्रीय विमानसेवेसाठीचं बुकिंग 31 मे पर्यंत बंद करण्यात आलं आहे. आणि 1 जून नंतरच्याच प्रवासासाठी बुकिंग सुरु आहे. अर्थात वेळोवेळी स्थितीचा आढावा घेऊन याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल असंही यात म्हटलं आहे.


एअर इंडिया ही सरकारी विमान कंपनी आहे, त्यामुळे एअर इंडिया पाठोपाठ आता खासगी विमान सेवाही अशाच पद्धतीनं बुकिंग सुरु करतात का याची उत्सुकता आहे. देशात सुरुवातीला 14 एप्रिलपर्यंत असलेला लॉकडाऊन आता 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. 20 एप्रिलनंतर देशातल्या काही भागात मात्र थोड्या सवलती मिळणार आहेत. कृषी क्षेत्र, ग्रामीण भागातले उद्योग यांच्यासाठी या सवलती असणार आहेत. त्यासाठीच्या गाईडलाईन्सही सरकारनं जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आता विमानसेवेबाबत 3 मे नंतरची स्थिती काय असते हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं महत्वाचं असणार आहे.


'आमची टेस्ट करा पण आम्हाला मुंबईत येऊ द्या', समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची व्यथा  


देशातील कोरोना संसर्ग होण्याचा वेग मंदावला
सर्वांसाठी सकारात्मक बातमी आली आहे. देशात कोरोना संसर्ग होण्याचा वेग मंदावला आहे. 14 हजार 792 लोकांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. पैकी 2014 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. म्हणजे एकूण रुग्णांपैकी 13.85 टक्के रुग्ण बरे झालेत. तर काल 991 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. मागील 24 तासात 43 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशातील सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने आर्थिक संकट उभे राहिले आहे. परिमाणी अनेक राज्यांमध्ये ज्या ठिकाणी कोरोना प्रभाव कमी आहे, अशा ठिकाणी काही अटींवर उद्योगधंद्यांना परवानगी देण्यात येणार असल्याचे समजते.


Business Plan After Lockdown | लॉकडाऊननंतर उद्योग-व्यापारातील तोटा कसा भरून काढायचा? विकोचे संचालक संजीव पेंढारकर यांचा कानमंत्र!