नवी दिल्ली : चीनच्या मुद्द्यावरुन सरकारवर एकापाठोपाठ एक प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींनी आज एक गंभीर आरोप सरकारवर केला. आपलं सैन्य चीन सीमेवर विनाशस्त्र का पाठवलं गेलं. हा प्रश्न निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलाखतीचा हवाला देत राहुल गांधींनी उपस्थित केला. त्यावरुन भाजपनंही जोरदार पलटवार केला आहे.
भारत-चीन सीमेवर 45 वर्षांनी रक्त सांडलं आणि राजकीय वर्तुळातही त्याचे जोरदार पडसाद उमटले. निवृत्त ले. जनरल एच एस पनाग यांच्या मुलाखतीचा आधार घेत राहुल गांधींनी सरकारवर हल्लाबोल केला. सीमेवर आपल्या जवानांना विनाशस्त्र का पाठवलं.
गलवान खोऱ्यात जी घटना घडली, त्यात गोळीबार झाला नाही असं सांगितलं गेलंय. चीननं कसा विश्वासघात केला हे परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्ययातही समोर आलं. पण मुळात आपल्या जवानांना तिथे विनाशस्त्र का पाठवलं गेलं. त्यांना कुठलंही बँकिंग का दिलं गेलं नव्हतं असा आरोप काँग्रेसनं केलाय. ज्या मुलाखतीच्या आधारे राहुल गांधी यांनी हा आरोप केला.
राहुल गांधींनी हा आरोप केल्यानंतर त्यावर भाजपनंही तातडीनं प्रत्युत्तर दिलं.अशा संकटाच्या काळात राहुल गांधी हे चीनच्या फायद्याची भाषा बोलतायत, मोदींवर प्रश्न उपस्थित करणं म्हणजे देशावरच प्रश्न उपस्थित करणं असं म्हणत संबित पात्रा यांनी हल्लाबोल केला. सीमेवर ही घटना घडल्यानंतर सरकारच्या वतीनं प्रतिक्रिया यायलाही 24 तास उशीर झाला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्यावरही राहुल गांधींनी पाच प्रश्न उपस्थित केले होते.
चीनच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी उद्या सर्वपक्षीय बैठकही बोलावली आहे. या बैठकीत सरकारची बाजू मांडली जाईल. पण त्याआधीच राजकीय वातावरण तापलंय.त्यामुळे उद्याची बैठक वादळी होणार याची चिन्हं दिसू लागलीयत.
संबंधित बातम्या :