Covaxin  : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) संयुक्त राष्ट्रांच्या खरेदी एजन्सींद्वारे Covaxin लसीचा पुरवठा स्थगित केल्यानंतर यावर भारताने गुरुवारी सांगितले की, ज्यांनी Covaxin लस घेतली आहे. या निर्णयामुळे त्या लोकांच्या प्रवासावर परिणाम होणार नाही. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, लसीच्या परिणामकारकतेबद्दल कोणताही प्रश्न उद्भवत नाही तसेच जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) निर्णय हा चिंतेचे कारण असू नये.


ही एक सुरक्षित लस आहे - बागची


डब्ल्यूएचओच्या निर्णयाबाबतच्या प्रश्नांना बागची उत्तरे देत होते. ते म्हणाले की, "कोव्हॅक्सीन घेणार्‍या लोकांवर काही परिणाम होईल असे मला वाटत नाही, ही एक सुरक्षित लस आहे. ही लस WHO च्या EUL (इमर्जन्सी यूज अथॉरिटी) अंतर्गत मान्यताप्राप्त आहे. विविध देशांनी ते आधीच स्वीकारले आहे," आमच्याकडे विविध देशांसोबत लसीकरण प्रमाणपत्र व्यवस्थेची परस्पर मान्यता देखील आहे." बागची म्हणाले की, हा मुद्दा काही महत्वाच्या प्रक्रियेशी संबंधित आहे. लसीचे निर्माता आणि डब्ल्यूएचओ या प्रकरणात लक्ष घालत आहेत. दरम्यान डब्ल्यूएचओने कोवॅक्सिनचा पुरवठा बंद केल्याने लोकांच्या प्रवासावर परिणाम होणार नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) घेतलेल्या निर्णयामुळे अजिबात काळजी होऊ नये.


अपग्रेड करण्याची आवश्यकता


बागची म्हणाले की, WHO ने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की निलंबन त्याच्या EUL (आणीबाणी वापर अधिकृतता) नंतरच्या तपासणीच्या परिणामांना प्रतिसाद म्हणून आहे, अलीकडे ओळखल्या गेलेल्या GMP मधील (चांगल्या उत्पादन पद्धती) कमतरता दूर करण्यासाठी प्रक्रिया आणि सुविधा अपग्रेड करण्याची आवश्यकता आहे.


भारत सरकार आणि नऊ देशांना लसींचा पुरवठा 
डब्ल्यूएचओने यूएनच्या खरेदी एजन्सीद्वारे कोवॅक्सिनचा पुरवठा बंद केल्याच्या घोषणेवर, भारत बायोटेकच्या सूत्रांनी सांगितले की फार्मा कंपनीने कोविड-19 लस यूएन एजन्सीला पुरवली नाही आणि निलंबनाचा कोणताही परिणाम होणार नाही. सूत्रांनी सांगितले की या फर्मने केंद्र सरकारच्या कार्यक्रमांतर्गत भारत सरकार आणि नऊ देशांना लसींचा पुरवठा केला आहे आणि आपत्कालीन वापराच्या परवानगीनुसार व्यावसायिक पुरवठा केला आहे. कोवॅक्सिनला 25 हून अधिक देशांकडून आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. तसेच बायोलॉजिकल E. Ltd (BE) ने जाहीर केले की जागतिक आरोग्य संघटना (WHO) तंत्रज्ञान हस्तांतरण केंद्राकडून mRNA तंत्रज्ञानाचा प्राप्तकर्ता म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे.