Corona Cases : देशात कोरोनाचा धोका कमी झाला आहे. गेल्या 24 तासात देशात 1 हजार 109 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 43 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर गेल्या 24 तासात 1 हजार 213 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. काल देशात 1 हजार 33 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर काल कोरोनामुळं 43 जणांचा मृत्यू झाला होता.
सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 492 वर आली आहे. कोरोना रुग्ण रिकव्हर होण्याचा दर हा 98.76 टक्के आहे. काल दिवसभरात कोरोनातून 1213 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या पॉझिटिव्हीटी रेट हा 0.24 टक्के आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा 0.23 टक्के एवढा आहे. दरम्यान गेल्या 24 तासात 4 लाख 53 हजार 582 कोरोनाच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख लोक कोरोनातून संसर्गमुक्त झाले आहेत.
सध्या देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत 185 कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत 185 कोटी 38 लाख लसींचे डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी राज्यात 128 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 24 तासात राज्यात 159 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 77,26,184 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के एवढे झाले आहे. राज्यात एकूण 828 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 6 करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87% एवढा झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7,96,09,229 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78,74,818 (09.89 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: