मुंबई : सोशल मीडियाच्या या वर्तुळात प्रत्येक क्षणाला ट्रेंडमध्ये येणारे असे अनेक विषय आहेत. हे विषय ट्रेंडमध्ये येण्यामागची कारणंही तशीच आहेत. आता हे ट्रेंडिंगचं गणित नेमकं कसं आहे, ही बाब किंबहुना हा प्रश्न अनेकांच्याच मनात घर करत असतो. हा एक वेगळाच मुद्दा. पण, सध्या या ट्रेंडिंग जगतामध्ये एकाच नावाची चर्चा सुरु आहे. हे नाव म्हणजे श्वेता.

ही श्वेता (Shweta) कोण, कुठची, काय करते, ती एकाएकी चर्चेत नेमकी का आली आहेहाच प्रश्न सध्या सोशल मीडियावर असणाऱ्या प्रत्येकाच्या मनात घर करत आहे. या मुलीच्या नावे असंख्य मीम्स तयार करण्यात आले असून ‘श्वेता’ ट्रेंडमध्ये आली आहे.

World Day of Social Justice 2021 | जाणून घ्या काय आहे ‘जागतिक सामाजिक न्याय दिवसा’चं महत्त्वं

याची सुरुवात नेमकी कुठून झाली?

एका ऑनलाईन क्लासमध्ये श्वेता नावाच्या मुलीनं कहरच केला. ऑनलाईन क्लासदरम्यान ती कोणाशीतरी संवाद साधत होती. यावेळ श्वेता तिच्या ऑनलाईन क्लासदरम्यान माईक बंद करण्यास विसरली. कोणा एका व्यक्तीबद्दल, खासगी नात्यांबद्दल आणि रिलेशनशिपबद्दल बऱ्याच पुढच्या चर्चा ही श्वेता करत असल्याचं या व्हायरल ऑडिओ क्लीपमधून ऐकण्यास मिळत आहे. बरं, श्वेता बोलण्यात इतकी मग्न होती, की ऑनलाईन क्लासमध्ये असणाऱ्या इतर विद्यार्थांनी तिला, माईक बंद करण्यास सांगूनही तिच्या कानांवर हे शब्द पडले नाहीत. इथूनच ही ‘श्वेता’वाणी सोशल मीडियावर भलतीच व्हायरल झाली.








श्वेता ज्या ऑनलाईन क्लासचा भाग होती, त्यामध्ये 111 विद्यार्थी उपस्थित होते. बरं, या सर्वांनीच श्वेता प्रकरण ऐकलं आणि आता त्यावर नेटकरी, मीम्स पेजेस हे त्यांच्या परिनं व्यक्त होऊ लागले आहेत. अतिशय विनोदी अंदाजात सध्या या अनोळखी श्वेताला सगळेच ओळख देत आहेत, असं म्हणाला हरकत नाही.