World Day of Social Justice 2021 वर्षभरात अनेक दिवस साजरा केले जातात, काही दिवस हे ठराविक कारणांसाठी ओळखले जातात. अशाच दिवसांपैकी क म्हणजे जागतिक सामाजिक न्याय दिवस. दरवर्षी 20 फेब्रुवारीला जागतिक सामाजिक न्याय दिवस असतो. सामाजिक न्यायाबद्दल जनजागृती करणं, हा या दिवसामागजचा मुख्य हेतू. थेट मानवतेशी संबंध असणाऱ्या या दिवसाची सुरुवात संयुक्त राष्ट्रांकडूनच करण्यात आली. विविध स्तरांवर होणारा भेदभाव दूर लोटत एकतेच्या मार्गावर सर्वांनाच एकवटणं हा हासुद्धा त्यामागचा आणखी एक हेतू.
यंदाच्या वर्षी या दिवसाचं महत्त्वं जास्त असणार आहे. ज्यामध्ये शाश्वत विकास साधण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या बहुतांश आंतरराष्ट्रीय संघटनांच्या योगदानाला दुजोरा देण्यात येत आहे. याशिवाय बेरोजगारीचं प्रमाण कमी करणं, रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासोबतच कामाच्या ठिकाणी असणारी सहजताही साध्य करणं हेसुद्धा या दिवसाचं महत्त्वं धोरेखित करुन जातात.
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 | ऐका, मराठमोळा कवी सादर करतोय हिंदी भाषेतील 'शिवचरित्र'
यंदाच्या जागतिक सामाजिक न्याय दिवसाची थीम काय?
कोविडच्या महामारीमुळं अनेक गणितं बदलली. यामध्ये एक महत्त्वाचं गणित होतं ते म्हणजे अर्थकारणाचं. जवळपास सर्वच राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेवर याचे परिणाम दिसून आले. किंबहुना यामध्य़े डिजीटल होण्याला जास्त वाव मिळाला. ही एक सकारात्मक बाब असली तरीही याची दुसरी बाजूही पाहायला मिळाली. यंदाच्या वर्षी हा दिवस डिजिटल माध्यमातून काम करणाऱ्यांपुढील आव्हानं आणि तत्सम परिस्थितीवर प्रकाश टाकणार आहे.
सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काम करण्यातील सातत्य, कामाचं स्वरुप, पगार, काम करण्याबाबतचे त्यांचे हक्क, कौशल्य, कामगार संघटनांमध्ये योगदानाचा हक्क किंवा एखादी संघटनास स्थापन करण्यासाठीच्या प्रयत्नांचा हक्क यासोबतच कामाच्या डिजिटल पद्धतींकडे वळलेल्या साऱ्यांचे हक्क, त्याची अंमलबजावणी आणि त्या माध्यमातून कर्मचारी वर्गाला मिळणारा न्याय हे यंदाच्या World Day of Social Justice 2021 चे मुख्य घटक असणार आहेत.