Dolly Chaiwala Success Story : चहा म्हणजे भारतीयांचा जीव की प्राण, सकाळची सुरूवात चहाने आणि संध्याकाळची वेळही चहाने सुंदर केली जाते. त्याचमुळे चहा हे भारतीयांचे सर्वात आवडते पेय आहे. म्हणूनच अब्जाधीश असलेल्या बिल गेट्स (Bill Gates) यांनाही भारतीय चहाची भुरळ पडली आणि त्यांनी चहासोबत एका चहा विक्रेत्याचंही कौतुक केलं. बिल गेट्स यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्याच व्हिडीओमुळे डॉली चहावाला मात्र भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. 


देशाच्या कानाकोपऱ्यात चहा वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे देशात चहाच्या व्यवसायातून अनेकांनी प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही कमावले आहेत. जगातील आघाडीचे अब्जाधीश उद्योगपती बिल गेट्स यांनी स्वतः भारतीय चहा विक्रेत्याचे कौतुक केले आहे. व्हिडीओ शेअर करताना ते म्हणाले की, तुम्हाला भारतात सर्वत्र नावीन्य मिळू शकते. सध्या भारत दौऱ्यावर असलेल्या अमेरिकन व्यावसायिकाने हा व्हिडीओ पोस्ट करताच तो व्हायरल झाला.


 






अब्जाधीश उद्योगपती बिल गेट्स यांनी ज्या चहा विक्रेत्याचे कौतुक केले आहे तो चहा बनवण्याची खास शैली आणि त्याची चव या दोन्ही गोष्टींसाठी देशात प्रसिद्ध आहे. नागपुरात राहणारी ही व्यक्ती संपूर्ण देशात डॉली चायवाला म्हणून ओळखली जाते. 


डॉली चायवालाची स्टाईल वेगळी 


महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असलेल्या नागपूरमध्ये डॉली चायवालाची एक वेगळी ओळख आहे. या व्यक्तीने 10वी नंतर शिक्षण सोडले आणि गेल्या 16 वर्षांपासून नागपुरातील सिव्हिल लाईन्सजवळ चहाचे दुकान चालवत आहे. डॉली चायवालाच्या चहाच्या स्टॉलवर जो कोणी चहा प्यायला येतो तो तिची स्टाईल आणि चव दोन्हीचा चाहता होतो.


डॉली तिच्या टपरीवर रजनीकांतच्या स्टाईलमध्ये ग्राहकांना चहा देते. एवढेच नाही तर डॉली ग्राहकांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करतो. त्यामुळे प्रत्येकजण भुलतो. खुद्द बिल गेट्सही डॉली चायवालाच्या स्टाईलच्या प्रेमात पडले होते.


डॉली चायवाला त्याच्या या छोट्या चहाच्या स्टॉलमधून चांगली कमाई करतो. डॉलीच्या शैली आणि चवीने अनेक सेलिब्रिटी प्रभावित झाले आहेत. सोशल मीडियावर डॉली चायवालाची बरीच चर्चा आहे.


ही बातमी वाचा: