मुंबई : सरकारी तिजोरीत पैसा हा वेगवेगळ्या टॅक्सच्या माध्यमातून जमा होत असतो. 2016-17 मध्ये थेट टॅक्स म्हणजेच प्रत्यक्ष कर (प्राप्तीकर आणि कॉर्पोरेट टॅक्स) 51.9 टक्के होता. तर बाकी पैसा हा अप्रत्यक्ष करातून सरकारच्या तिजोरीत जमा झाला.

जुलै 2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर सरकारच्या कर प्रणालीत बरेच बदल झाले. दरम्यान, सरकारकडे जमा होणारा पैसा वेगवेगळ्या पद्धतीने खर्चही केला जातो. पाहा सरकारकडे नेमका पैसा येतो कसा आणि खर्च होतो कसा...

2016-17 मध्ये सरकारकडे कशापद्धतीने पैसा जमा झाला?

कॉर्पोरेट टॅक्स - 28.2 %

प्राप्तीकर - 23.1 %

एक्साइज - 21.3 %

सर्व्हिस टॅक्स - 14.4 %

कस्टम - 12.8 %

पाहा सरकारने पैसा कुठे-कुठे खर्च केला :

व्याज भरणा - 24.4 %

संरक्षण बजेट - 12.2 %

अन्न सुरक्षा - 6.8 %

पेन्शन - 6.1 %

ग्रामीण विकास - 6 %

दळणवळण - 5.8 %

गृह खात्यावर - 3.9 %

शिक्षण - 3.7 %

खतांवरील अनुदान - 3.3 %

कृषी - 2.6 %

आरोग्य - 2.3 %

शहरी विकास - 1.9 %

सामाजिक लाभ - 1.8 %

उर्जा - 1.7 %

अर्थ - 1.4 %

पेट्रोल अनुदान - 1.2 %

वाणिज्य आणि उद्योग - 1.1 %

विज्ञान - 1 %

आयटी आणि टेलिकॉम - 1 %

परदेशी धोरण - 0.7 %

केंद्रशासित - 0.6 %

आयकर विभाग संचालन - 0.6 %

अन्य - 3.1 %

संबंधित बातम्या :

#अर्थबजेटचा : अर्थसंकल्पातील आतापर्यंतचे महत्त्वाचे मुद्दे

येत्या वर्षात 70 लाख नोकऱ्या देणार : अरुण जेटली


अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, पेट्रोल-डिझेल स्वस्त

Budget 2018 Live: कर रचनेत बदल नाही, प्रत्येक बिल महागणार!