मुंबई : एसबीआयने व्याजदरात कपात केल्यामुळे कर्जदारांना नववर्षाच्या सुरुवातीलाच गुड न्यूज मिळाली आहे. 20 ते 25 वर्ष इतका दीर्घ कालावधी असलेल्या कर्जदारांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. कर्जदरातील कपात ही विशेषतः कर्जाच्या टेन्युअर म्हणजेच कालावधीत घट करणारी ठरली आहे. 90 बेसिस पॉइंट्सच्या कपातीमुळे कर्ज परतफेडीची 25 वर्षांची मुदत तब्बल पाच वर्षांनी कमी झाली आहे, तर 20 वर्षांची मुदत तीन वर्षांनी घटली आहे. थोडक्यात कर्जाच्या व्याजदरात घट झाल्यावर बँका ईएमआयची रक्कम कमी करत नाहीत, तर नव्या दराला अनुरुप कर्जाची मुदत बदलतात. ज्या कर्जाचा कालावधी संपत आला आहे, त्याला मात्र फारसा फरक पडणार नाही. जी गृहकर्ज 'मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट' (एमसीएलआर)शी लिंक केलेली आहेत, त्यांनाही तूर्तास बदल जाणवणार नाही. मात्र तज्ज्ञांनी एमसीएलआरवर शिफ्ट होण्याचा सल्ला दिला आहे. कर्जदारांना एमसीएलआरवर शिफ्ट होण्यासाठी कन्व्हर्जन फी द्यावी लागेल, मात्र ईएमआय कमी असल्याने ही तूट लगेच भरुन निघेल.

बँकांकडून नवीन वर्षाचं गिफ्ट, व्याजदरात मोठी कपात

25 वर्षांसाठी 50 लाखांचं कर्ज असलेल्या कर्जदारांचा ईएमआय 9.15 टक्क्यांवरुन 8.25 टक्क्यांवर गेल्यास ग्राहकाला दरमहा तीन हजार रुपयांची बचत करता येईल. 50 लाखांच्या कर्जाच्या मुदतीवर होणारा परिणाम
EMI (रुपयांत)कर्जाची मूळ मुदत (9.15 टक्क्यांनुसार)कर्जाची नवी मुदत(8.25 टक्क्यांनुसार)मुदतीत झालेली घट
42 हजार 475300 महिने242 महिने58 महिने
45 हजार 470240 महिने206 महिने34 महिने
51 हजार 160180 महिने162 महिने18 महिने
63 हजार 744120 महिने113 महिने7 महिने
1 लाख 4 हजार 15660 महिने58 महिने2 महिने
  25 वर्षांच्या कर्जाच्या ईएमआयवर होणारा परिणाम
कर्जाची रक्कम (रुपयांत)9.15 टक्क्यानुसार ईएमआय (रुपयांत)8.25 टक्क्यानुसार नवा ईएमआय (रुपयांत)ईएमआयमधील बचत (रुपयांत)
20 लाख16 हजार 99015 हजार 7701 हजार 220
30 लाख25 हजार 48523 हजार 6551 हजार 830
50 लाख42 हजार 47539 हजार 4253 हजार 50
एक कोटी84 हजार 95078 हजार 8506 हजार 100