West Bengal Fire Cracker Factory : पश्चिम बंगाल (West Bengal) स्टेट युनिव्हर्सिटीपासून अवघ्या 3 किमी अंतरावर असलेल्या उत्तर 24 परगनाच्या दत्तपुकुर येथे एका बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात सकाळच्या सुमारास मोठा स्फोट झाला आहे. या भीषण स्फोटात किमान आठ जण ठार आणि पाच जण जखमी झाले. या स्फोटात अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीचे छत पूर्णपणे उडून गेले आणि मृतांचे छिन्नविछिन्न झालेले मृतदेह रस्त्यावर आले. या संदर्भात पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे.


कोलकात्याच्या उत्तरेस 30 किमी अंतरावर असलेल्या दत्तपुकुर पोलीस स्टेशन क्षेत्रातील नीलगंजच्या मोशपोल येथील कारखान्यात अनेक लोक काम करत असताना सकाळी 10 च्या सुमारास हा स्फोट झाला. “आतापर्यंत तीन मृतदेह सापडले आहेत. या स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत,” अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


मे महिन्यातही असाच स्फोट झाला होता 


मे महिन्यात पूर्वा मेदिनीपूर जिल्ह्यातील एग्रा येथे एका बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात अशाच प्रकारे स्फोट झाला होता. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले होते. इग्रा क्षेत्र ओडिशाच्या सीमावर्ती राज्याच्या सीमेजवळ आहे. याप्रकरणी आरोपींनाही अटक करण्यात आले होते.


या घटनेतील मुख्य आरोपीचा नंतर ओडिशातील कटक रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, हा आरोपी स्फोटाच्या वेळी उपस्थित होता आणि 80 टक्के भाजला होता. त्याला अटक करण्यासाठी कटकला पोहोचलेल्या पोलिसांना त्याचा मृत्यू झाल्याचे हॉस्पिटलमध्ये समजले.


बॉम्ब बनवल्याचा आरोप होता


फटाके बनवण्याच्या नावाखाली या कारखान्यात क्रूड बॉम्ब तयार केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि स्फोटात आपले नातेवाईक गमावलेल्या लोकांनी केला होता. त्यावेळी पूर्व मिदनापूरचे पोलिस अधीक्षक (एसपी) अमरनाथ के म्हणाले होते की, राज्यात अनेक ठिकाणी अशा बेकायदेशीर कारखान्यांवर छापे टाकले जात आहेत. अनेक अवैध कारखानेही उघडकीस आले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्य पोलिसांना अशा बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. सध्या अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Weekly Recap: चंद्रोत्सव, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीचा डंका आणि लोकसभा निवडणुकीची तयारी; या आठवड्यातील लक्षवेधी घडामोडी वाचा सविस्तर