Buddhadeb Bhattacharya Daughter will become Transgender Man : पश्चिम बंगालचे (West Bengal) माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य (Buddhadeb Bhattacharya) यांच्या मुलीने लिंग परिवर्तन (Gender Change) करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आपण या लढाईसाठी तयार असल्याचं तिने सांगितलं आहे. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांची मुलगी सुचेतना भट्टाचार्य (Suchetna Bhattacharya) लिंगबदल शस्त्रक्रिया (Gender Change Surgery) करणार आहे. शुक्रवारी, 23 जून रोजी सुचेतना यासंदर्भात माहिती दिली आहे. सुचेचना लिंगबदल शस्त्रक्रिया करुन ट्रान्सजेंडर पुरुष बनणार आहे. तसेच आपण नावही बदलणार असल्याचं तिने सांगितलं आहे. सुचेतनाने आधी सांगितलं होती की, ती सुचेतन या नावाने हाक मारणं आणि ओळख पसंत करते. 


माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी करणार लिंग परिवर्तन


पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अलीकडेच सुचेतना भट्टाचार्य एलजीबीटीक्यू (LGBTQ) समुदायाच्या एका परिषदेत सहभागी झाली होती. या परिषदेत तिने तिचं मत मांडलं. तिने सांगितलं की, ''मला अनेकदा अपमानित केले गेले आहे कारण मी किशोरवयीन असल्यापासून स्वतःला एक स्त्री म्हणून नाही तर एक पुरुष म्हणून पाहत असे. मला वाटतं आता मी या लढाईसाठी तयार आहे.''


सुचेतनाच्या आईचा आक्षेप


सुचेतनाचे वडील माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी नेहमीच तिला पाठिंबा देत तिच्या निर्णयाचं समर्थन केलं, असं तिने सांगितलं. सुचेतना म्हणाली की, तर आई मीराचा याला आक्षेप होता पण, असं असतानाही तिने सुचेतनाला कधीही विरोध केला नाही. सुचेतनाने नुकत्याच झालेल्या एलजीबीटीक्यू कॉन्फरन्समध्ये स्वत:ची ओळख सुचेतन, एक सामाजिक कार्यकर्ता आणि 'फ्रीलान्स ग्राफिक डिझायनर' अशी करून दिली.


लिंगपरिवर्तन शस्त्रक्रियेबद्दल सुचेतना काय म्हणाली?


सुचेतनानं सांगितलं की, ती आता लिंगपरिवर्तनासाठी तयार आहे. लवकरच लिंग बदलासाठी शस्त्रक्रिया करणार असल्याचंही तिने सांगितले. सुचेतना म्हणाली, ''ज्यांनी मला सोशल मीडियावर पाठिंबा दिला, त्या सर्वांची मी आभारी आहे. मला सर्वांच्या शुभेच्छांची गरज आहे." सुचेतना पुढे म्हणाली की, अधिकृत ओळखपत्रातील नाव आणि लिंग बदलण्याची कायदेशीर प्रक्रिया शस्त्रक्रियेपूर्वी करण्यात येईल. या प्रकरणी माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य आणि त्यांच्या पत्नीकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.


संबंधित इतर बातम्या :


Naaz Joshi : 10 व्या वर्षी कुटुंबाने काढलं घराबाहेर, कधी मागितली भीक, तर कधी सेक्स वर्करचं काम; ट्रांसजेंडर ब्युटी क्वीन 'नाज'ची संघर्ष गाथा