कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये असेही एक क्षेत्र आहे जिथे वाघांनी 3000 महिलानां विधवा केलय. हे क्षेत्र सुंदरबनजवळ दक्षिण 24 परगणा. सुंदरबनमध्ये मोठ्या संख्येने वाघ राहतात. परंतु परिसरातील लोक बर्याचदा या जंगलात मासे, मध आणि खेकडे पकडण्यासाठी जातात. यावेळी नागरिक नरभक्षक वाघांचे शिकार बनतात. वाघांच्या हल्ल्यामुळे विधवापण आलेल्या महिलांच्या नजरेतून पश्चिम बंगालची निवडणूक जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
पश्चिम बंगालला आणि बांगलादेश सीमेवर मोठ्याप्रमाणावर घनदाट जंगल आहे. या घनदाट जंगलामध्ये वास्तव आहे पट्टेदार बंगाली टायगरच. जंगल सीमेवर अनेक गाव आहेत आणि त्यात हजारो लोक वास्तव्य करतात. जंगलात मासेमारी गोळा करणे आणि खेकडा पकडणे हा त्यांचा उद्योग आणि यावरच अनेकांची उपजीविका. पाच-दहा लोकांचा जथा जंगलात मासेमारी करण्यासाठी पंधरा पंधरा दिवस वास्तव्यास असतो. त्यात अनेकवेळा वाघ हल्ले करतात. यात दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे इथल्या काही वस्त्यांना विधवा पाडा म्हणूनही ओळखलं जातं आणि याच वाघांच्या हल्ल्यात विधवा झालेल्या महिलांच्या नजरेतून निवडणूक जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
कोलकत्तापासून जवळपास 150 किमी प्रवास केल्यानंतर आम्ही गोसावी जी 24 परगणाला जाऊन पोचलो. गोसाबा गावापासून पुढच्या गावात जाण्यासाठी होडीने प्रवास केला. गोसाबा गावातून प्रवास करून आम्ही आरमपूर गावात पोहोचलो. तिथे जंगल किनार्यावर जाण्यासाठी तुम्हाला टोटो म्हणजेच तिथल्या रिक्षाने प्रवास करावा लागतो. याच आरमपूर गावाला विधवापाडा म्हणून ओळखलं जातं. इथे आम्हला भेटल्या फुलमती रॉय वर 60 वय आजही शेतात काम करतात त्यांनी आम्हाला त्यांच्या पतीविषयी सांगितलं. 25 वर्षांपूर्वी माझे पती हरेन रॉय हे मछली पकडण्यासाठी गेले होते. काही दिवसांनी परत आलेल्या लोकांनी सांगितलं की तुमच्या पतीला वाघाने मारलं. त्यावेळी 4 मुली आणि 2 मुलांची आई होते. लोकांच्या घरी काम करून त्यांनी संभाळ केला. आज 2 मुलं जंगल भागातील नदीला मासे आणि खेकडे पकडण्यासाठी जातात. एकदा जंगलात गेले तर 10 ते 15 दिवसांनी परत येतात. फुलमती रॉय याना हिंदी बोलता येत नव्हते .त्यामुळे आम्ही आमचे चालकांची मदत घेतली. त्यावेळी फुलमती म्हणाल्या.
माझे पती मासे पकडण्यासाठी जंगलातील नदीला गेले होते. चार ते पाचजण सोबत होते. त्यांनी सांगितलं की तुमच्या पतीला वाघाने मारलं आहे. त्यावेळी मी सहा मुलांची आई होते. चार मुलं आणि दोन मुलींचा सांभाळ मी काबाड कष्ट करून केला. माझा मुलगा आहे त्याच जंगलामध्ये मासे पकडण्यासाठी जातो पंधरा दिवस जंगलात असतो. पोटासाठी करावं लागतं. भीती वाटते मतदानाच्या वेळी लोक येतात आश्वासने देतात. मात्र, पुढे काही होत नाही. आता या गोष्टीला बरीच वर्षे झाली आहे. त्यामुळे चारशे रुपयांची पेन्शन मिळावी बाकी काही नाही.
फुलमती यांचा मुलगा देवप्रसाद रॉयला भेटलो तेही जंगलात जातात. 10 -15 दिवसांचा मुक्काम त्यांनी त्याचे अनुभव सांगितले. मी आतापर्यंत अनेकवेळा वाघाला प्रत्यक्ष पाहिले आहे. वाघाने एकदा माझ्यासमोर हल्ला केला. वाघ अचानक हल्ला करतो पर्याय उरत नाही. जंगलातील नदीत लावलेलं जाळ दुरुस्त करण्यासाठी गेलो तर वाघ हल्ला करतो पाण्यात असल्याने काही करता येत नाही. जंगलात जाताना भीती वाटते. पण शेवटी पर्याय नाही. शेती नाही जगायचं असेल तर काम करावं लागतं. गावात फिरताना आम्हाला टीएमसी पाणी भाजपचे ट्रेंडी आणि बॅनर लागलेले दिसले. कुठे कुठे डाव्या पक्षांन बॅनर गावात गाणं पोहोच केले. मात्र, महिलांना मदत नाही.
आता तुम्ही म्हणाल की ही लोक जंगलात जातात कशाला त्याचं कारण आहे पोट. त्यासाठी वेळप्रसंगी जंगलात प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करतो आणि आपला जीव धोक्यात घालतो. सुमारे 60 हजार लोक जंगलात काम करतात अशी माहिती मिळाली आहे. परंतु, अधिकृतपणे, त्यापैकी केवळ एक तृतीयांश परवानगी आहे.
पुढे आम्ही कल्पना नावाच्या महिलेला भेटलो तीन वर्षांपूर्वी तिच्या पतीचा मृत्यू वाघाचा हल्यात झाला होता. पंधराव्या वर्षी लग्न, 20 वर्षी एक मूल आणि 31 च्या वर्षीच पतीचं निधन. कल्पना म्हणते (कल्पना मराठी भाषांतर) जंगलातून येताना माझ्या पतीवर वाघाचे हल्ला केला. त्यांनी लोकांना मदत मागितली. तीन लोकांनी मदतही केली. लोकांनी लाकडाच्या साह्याने वाघाला पळवलंही. त्यांना बोटीत टाकलं रुग्णालयात हलवलं. मला हे कळाल्यानंतर मी रुग्णालयात पोचले. पण या हल्ल्या एवढा जबर होता की त्यात त्याचा मृत्यू झाला. मला एक मुलगी आहे. मला थोडी शेती आहे आणि लोकांच्या शेतात काम करून मी पोट भरते. कोणीही मदत करत नाही.
या वाघांच्या हल्ल्यात अनेकजण थोडक्यात बचावले. काही वेळा तर वाघ गावात येतात असं इथले नागरिक म्हणतात त्यावेळी बचावलेल्या बापलेकाचा अनुभव आणि डोळ्यात पाणी आणणारा होता . वाघ गावात शिरला त्यामुळे काही लोक तिकडे पळाले त्यात माझे वडील देखील होते .वाघाने अचानक हल्ला केला.लोक पळाले , वन अधिकारी बंदूक सुडून पळाले मी काठी घेऊन वाघाला मारलं म्हणून तो पळून गेला.वडिलांच्या पायावरची , हतावरची जखम दाहवत तो सांगत होता. या परिसरात अशी अनेक गावे आहेत जिथे प्रत्येक घरात विधवा आहे. तिच्या नवऱ्याची व वाघाने शिकार केली आहे.
त्यातील काही महिलांच्या प्रतिकीया
मला लहान बाळ आहे. 3 वर्षांपूर्वी पतीचा वाघाच्या हत्यात मृत्यू झाला. सरकारकडून काही मिळाले नाही. जगते आहे पाहुयात अस पन्नशीतील महिला म्हणाली तर नीटसे कपडे ही घालण्यासाठी नसलेली महिला म्हणते की मला दोन मुलं आहेत. पतीच्या मृत्यूला दोन वर्ष झाले कागदपत्रे फोरेस्टच्या अधिकाऱ्यांनी नेले पण मदत नाही. मत मागण्यासाठी येतात त्यावेळी आश्वासन मिळत पण पुढं काही होत नाही. या वाघांच्या हल्ल्यातून वाचलेल्या कोणाचं नाक तुटलं आहे .कोणाच्या पायावर जखम आहे तर कोणाचा हात निकामी झाला आहे .ही सगळी मंडळी आपल्या जखमा सांगत आपली कैफियत सांगत होते.
या भागात वाघांनी केवळ सामान्य व्यक्तीनाच नाही तर वन अधिकाऱ्यांना देखील आपलं भक्ष्य बनवलं. वनविभागाचे 21 अधिकारीही मरण पावले आहेत. तर लॉकडाऊनच्या काळात एका गावात 10 ते 12 व्यक्तींना वाघाने मारल्याचे सांगतील. सुभोध मिस्त्री नावाच्या एका रिक्षाचालकाने सांगितले की लॉकडाऊन च्याकाळात शेजारच्या गावातून 10 लोकांना वाघाने हल्ला करून ठार केलंय. आम्ही लोक पोट भरण्यासाठी जंगलात जातो पण त्याज जीवही जातो.
वाघांच्या हल्ल्यात विधवा झालेल्या लोकांसाठी अनेक सेवाभावी संस्था काम करतात.. परिसरात अशी अनेक गावे आहेत जिथे प्रत्येक घरात विधवा आहे. दक्षिणबंगा मत्स्य बीज फोरमचे प्रमुख प्रदीप चटर्जी म्हणतात की आतापर्यंत या भागात नरभक्षक वाघामुळे अंदाजे 3000 महिला विधवा झाल्या आहेत. खरडा मेन वेल्फेअर सोसायटीच्या लिपिका शेन चॅटर्जी म्हणतात या या विधवांसाठी सरकारांनी काही पावले उचलून त्यांच्या जगण्याची व्यवस्था केली आहे.
मंडळी या गावात 4जी रेंज आहे. सिमेंटचे रस्ते ही आहेत नाही ती एक गोस्ट हाताला काम .त्यामुळे लोक जगलात जातात .आणि आपला जीव पणाला लावतात .यातील प्रत्येकजण म्हणत होता निवडणूक येते जाते .तशी आस्वासनही त्यामुळे आता कोणी मदत करेल यावर विश्वासच बसत नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Petrol Diesel Prices : चार दिवसानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट, जाणून घ्या आजचा दर
- माजी मुख्यमंत्री देशासाठी धोका? पासपोर्ट फेटाळल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांचा सवाल
- Gold Silver Price | सोन्याचा भाव 'जैसे थे' तर चांदीच्या दरात 1000 रुपयांची वाढ