कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये आगामी विधासभा निवडणुकांपूर्वी राजकीय पटलावर बऱ्याच घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे. याचदरम्यान, गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कूचबिहार येथे एक सभा घेतली. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
पश्चिम बंगालमध्ये सर्व वातावरण असं करण्यात आलं आहे, जणू इथं जय श्रीराम बोलणं म्हणजे एक गुन्हाच. ममता दीदींच्या बंगालमध्ये जय श्रीराम म्हटलं नाही जाणार मग, काय ते पाकिस्तामध्ये म्हटलं जाणार का?, असा सवाल करत त्यांनी बंधु आणि भगिनींनो जय श्रीराम म्हणावं की नाही असा प्रश्न उपस्थितांनाही केला.
ममता दीदीही जय श्रीराम म्हणतीलच...
सभेसाठी आलेल्या जनसमुदायाकडूनही शाह यांनी 'जय श्रीराम' असा घोष करवून घेतला. पुढं शाह म्हणाले, 'ममता दीदींना हा अपमान वाटतो. संपूर्ण देश आणि जगभरातील अनेकजण आपल्या आराध्य श्रीराम यांच्या स्मृतींनी गौरवान्वित होतात. पण, तुम्हाला मात्र याचा त्रास होतो. कारण, तुमचं लक्ष अमुक एका गटाकडून मिळणाऱ्या मतांकडेच आहे.' असं म्हणत तुम्हाला यांची मतं नको आहेत, असं समोर उपस्थित असणाऱ्या जनसमुदायाला उद्देशून म्हटलं. इतकंच नव्हे, तर निवडणुका संपेपर्यंत खुद्द ममता बॅनर्जी, यासुद्धा जय श्रीराम म्हणतीलच, असं वक्तव्यही त्यांनी केलं.
७४ एटीएम कार्डसह क्लोनिंग मशीन जप्त, लाखो रुपये लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
तृणमूल काँग्रेल पक्षाचे 'गुंड' इथं भाजपची सत्ता येण्यापासून रोखू शकणार नाही, असं म्हणत परिवर्तन रॅली ही मुख्यमंत्री किंवा मेता बदलण्यासाठी नसून घुसखोरी रोखण्यासाठीच आहे, असं ठाम वक्तव्य केलं. परिवर्तन रॅलीच्या माध्यमातून आत्या- भाचा म्हणजेच ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांचा भ्रष्टाचार संपुष्टात आणणं हे अमित शाहंचं मुख्य लक्ष्य आहे.
दरम्यान, एप्रिल- मे महिन्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका असल्याचं म्हटलं जात आहे. ज्या पार्श्वभूमीवर आतापासूनच प्रचारसभा, सभा यासाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली आहे. ममता सरकारमधील उणिवा शोधण्यात विरोधक व्यग्र आहेत, तर सत्ताधारीमात्र सरकारच्या विकासकामांच्या बळावर मतदारांना विश्वासात घेत आहेत.