मुंबई : तुम्हाला दररोज महामार्गावर प्रवास करावा लागत असेल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानुसार, FASTag खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची अट काढून टाकली आहे. यापुढे FASTag खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज भासणार नाही. टोल प्लाझावर ट्रॅफिक जामची परिस्थिती उद्भवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
केवळ प्रवासी वाहनांसाठी FASTag चे नियम बदलण्यात आले आहेत. व्यावसायिक वाहनांसाठी अद्याप जुना नियम लागू आहे. FASTag च्या खरेदीदरम्यान, प्रवासी वाहनांच्या जसेकी कार, जीप, व्हॅनसाठी सिक्युरिटी म्हणून काही शिल्लक ठेवणे बंधनकारक होते. टोल प्लाझावरुन जात असताना ड्रायव्हरच्या FASTag रिचार्ज नसल्यास वाहनांना टोलवर थांबावं लागत होतं. यामुळे टोल प्लाझावर ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता असते. पण आता असं होणार नाही. टोल प्लाझा पार केल्यानंतर, जर आपल्या खात्यात उणे शिल्लक राहिली असेल तर, बँक सिक्युरिटी मनी वसूल करू शकेल, जे वाहन मालकास पुढील रिचार्जवर भरावे लागेल.
15 फेब्रुवारीपासून FASTag अनिवार्य होणार
केंद्र सरकारने आता संपूर्ण देशात FASTag सक्तीचे केले आहे. महामार्गावर टोल भरताना आपल्याला FASTag द्वारे पैसे द्यावे लागतील. 15 फेब्रुवारीपर्यंत सर्व वाहनांवर FASTag स्टिकर बसवणे बंधनकारक असेल. यापूर्वी डिसेंबरमध्ये, FASTag च्या अंमलबजावणीची नवीन अंतिम मुदत 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली होती.
Maharashtra RTO Rules: परराज्यात घेतलेलं वाहन महाराष्ट्रात आणायचंय? काय आहेत RTO चे नियम?
FASTag कुठे उपलब्ध होईल?
जर आपण अद्याप आपल्या वाहनावर FASTag स्टिकर लावले नसेल तर तुम्हाला ते लवकरच लावले पाहिजे. पेटीएम, अॅमेझॉन, स्नॅपडील इत्यादींकडून FASTag खरेदी केलं जाऊ शकतं. तसेच, देशातील 23 बँकांच्या माध्यमातून FASTag उपलब्ध होईल. या व्यतिरिक्त रस्ते वाहतूक प्राधिकरण कार्यालयातही FASTag ची विक्री केली जाते. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) त्यांच्या उपकंपनी इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (आयएचएमसीएल) च्या माध्यमातूनही FASTag ची विक्री करते.
नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानुसार FASTag ची किंमत 200 रुपये आहे. यात तुम्ही किमान 100 रुपये रिचार्ज करू शकता. जोपर्यंत FASTag स्कॅनर स्कॅन करतो, तोपर्यंत FASTag काम करेल.
WEB EXCLUSIVE | परराज्यात घेतलेलं वाहन महाराष्ट्रात आणायचंय? 'हे' आहेत RTO चे नियम?