कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. अशातच सर्व पक्ष चौथ्या टप्प्यातील मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रचार करत आहेत. अनेक मोठे नेतेही या प्रचारात सहभागी होणार आहेत. पक्षाच्या शक्तीप्रदर्शनासाठी आणि मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज वेगवेगळ्या ठिकाणी रोड शो करणार आहेत. तसेच ममता बॅनर्जी आज तीन प्रचार सभांना संबोधित करणार आहेत. चौथ्या टप्प्यात 44 जागांसाठी मतदार 10 एप्रिल रोजी पार पडणार आहे.
चौथा टप्प्या महत्त्वाचा
असं मानलं जात आहे की, चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारात प्रत्येक पक्ष कसोशीनं प्रयत्न करताना दिसणार आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीतील चौथा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण या टप्प्यात अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
चौथ्या टप्प्याच्या प्रचारासाठी अधिकाधिक सेलिब्रिटींना तसेच दिग्गजांना प्रचार सभांमध्ये उतवरण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. तर टीएमसीकडून ममता बॅनर्जी स्वतः प्रचार करताना दिसत आहेत. तसेच काँग्रेस आणि वाम दलाकडूनही अनेक दिग्गज प्रचार करत आहेत.
तिसऱ्या टप्प्यात 77.68 टक्के मतदान
पश्चिम बंगालच्या तिसऱ्या टप्प्यात काही ठिकाणी हिंसा झाली. मंगळवारी पार पडलेल्या मतदानात मतदारांचा उत्साह दिसून आला. राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेला टीएमसी आणि भाजपने एकमेकांवर हिंसाचाराचे आरोप लावले. तरिही मतदारांचा उत्साह कायम होता. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये 77.68 टक्के मतदान झालं.
निवडणूक कधी?
दरम्यान, राज्यात एकूण आठ टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. तीन टप्प्यांमधील मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. चौथ्या टप्प्यासाठी 10 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. तर, पाचव्या टप्प्यात 45 जागांसाठी 17 एप्रिल रोजी, सहाव्या टप्प्यात 43 जागांवर 22 एप्रिल रोजी, सातव्या टप्प्यात 36 जागांसाठी 26 एप्रिल रोजी आणि आठव्या अंतिम टप्प्यात 35 जागांवर 29 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. तसेच पाच राज्यांमध्ये एकत्र 2 मे रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- BJP Foundation Day : संकट काळात तयार झाला नव्या भारताच्या विकासाचा आराखडा : पंतप्रधान नरेंद्र मोदी
- West Bengal Election : मुस्लिम बहुल जागांवरील त्रिकोणी लढतीचा फायदा ममतांना की मोदींना?
- भाजप उमेदवार विधान पाडवी यांच्या गाडीवर हल्ला; फलता मतदारसंघातील मतदान केंद्रावरील घटना
- WB Election 2021 : पश्चिम बंगालच्या मिठाईतही निवडणुकीचे रंग, मोदी-दीदींचे भन्नाट पुतळे!