BJP Foundation Day : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. तसेच भाजप सरकारनं केलेल्या कामांचाही यावेळी त्यांनी उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, कोरोना महामारीच्या संकटकाळात सरकारनं नव्या भारताच्या विकासासाठी आराखडा तयार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, पहिल्यांदाच देशात एखाद्या सरकारनं शेतकऱ्यांची काळजी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देखील कार्यकर्त्यांना संबोधित केलं. 


मोदींनी मानले अडवाणी आणि जोशी यांचे आभार 


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलताना सांगितलं की, "ही 41 वर्ष या गोष्टीची साक्षीदार आहे की, सेवा आणि समर्पणासोबतच एखादा पक्ष कसं काम करतो आणि सामान्य कार्यकर्त्याचा त्याग एखाद्या पक्षाला कुठून कुठे पोहोचवू शकतो." पुढे बोलताना ते म्हणाले की, "पक्षाला आकार आणि विस्तार देणारे आमचे आदरणीय लाल कृष्ण अडवाणी, आदरणीय मुरली मनोहर जोशी यांसारख्या वरिष्ठांचे आशीर्वाद सदैव आमच्यासोबत राहो."


पंतप्रधान पुढे बोलताना म्हणाले की, "देशाचा कदाचितच असो कोणतं राज्य किंवा जिल्हा असेल, जिथे पक्षाच्या 2-3 पिढ्या खर्च झालेल्या नाहीत. मी आज जनसंघापासून भाजप पक्षापर्यंत राष्ट्रसेवेच्या यज्ञात आपलं योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आदरपूर्वक नमन करतो."


भाजपचा 'सेवा हीच संस्था' हा संकल्प : पंतप्रधान मोदी 


मोदी म्हणाले की, "डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी, कुशाभाऊ ठाकरे, राजमाता सिंधिया अशा अगणित महान व्यक्तिमत्त्वांना भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याकडून मी श्रद्धांजली अर्पण करतो." पुढे बोलताना ते म्हणाले की, "गेल्या वर्षी कोरोनाने संपूर्ण देशासमोर एक विचित्र संकट उभं केलं होतं. तेव्हा तुम्ही सगळेजण आपलं सुख आणि दुःख विसरुन देशवासियांच्या सेवेसाठी हजर झालात. तुम्ही 'सेवा हीच संस्था' हा संकल्प अंगीकारलात, आणि त्यासाठी काम केलं." 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


BJP Foundation day: भाजपचा आज स्थापना दिवस, पंतप्रधान करणार पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित