दिल्लीत लॉकडाऊन होईल का? नाईट कर्फ्यूच्या घोषणेदरम्यान केजरीवाल सरकारनं काय सांगितलं

एबीपी माझा वेब टीम Updated at: 06 Apr 2021 08:29 PM (IST)

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने आज ते 30 एप्रिल दरम्यान नाईट कर्फ्यू जाहीर केला आहे.

आज मंगळवारी रात्री दहावाजेपासून याची अंमलबजावणीही करण्यात येणार आहे.

संग्रहित छायाचित्र

NEXT PREV

नवी दिल्ली : दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारने आज ते 30 एप्रिल दरम्यान राजधानी दिल्लीत नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता केजरीवाल सरकार दिल्लीमध्ये लॉकडाऊन टाकण्याचा विचार करीत आहे का, असा प्रश्नही पुन्हा निर्माण होत आहे. लॉकडाऊन संदर्भात दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाळ राय यांनी आता सांगितले आहे की आम आदमी पार्टी सरकार लॉकडाऊनचा विचार करत नसून इतर पर्यायांवर विचार करीत आहे.


गोपाळ राय म्हणाले, की कोरोना व्हायरस लशीची निर्यात थांबवावी आणि सर्वांसाठी लसीकरण खुले करावे. ते म्हणाले, "दिल्ली सरकार सर्व पर्यायांचा विचार करत आहे." कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यात नाईट कर्फ्यूची भूमिका महत्वाची आहे. मात्र, सरकार यावर पूर्णपणे अवलंबून नाही."


ते म्हणाले, की “आम्ही लॉकडाऊनचा विचार करीत नाही. मला विश्वास आहे की आम्ही इतर वैकल्पिक उपायांनीही कोरोना प्रसार रोखू शकतो."


गोपाळ राय म्हणाले की, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रत्येकासाठी लसीकरण सुरु करायला हवे. “दुर्दैव आहे की केंद्राने आपल्या लोकांना लसी देण्यासाठी निकष लावले आहेत. सोबतचं ते लस इतर देशांत निर्यात करत आहे.


30 एप्रिलपर्यंत दिल्लीत नाईट कर्फ्यू लागू
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकणांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने आज ते 30 एप्रिल दरम्यान रात्री कर्फ्यू जाहीर केला आहे. मंगळवारी रात्री दहावाजेपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आजपासून 30 एप्रिलपर्यंत दररोज सकाळी 10 ते सकाळी 5 या वेळेत शहरात कर्फ्यू असेल. दिल्ली सरकारने अत्यावश्यक सेवा आणि अत्यावश्यक वस्तू वगळता सर्व हालचालींवर सकाळी 10 ते सकाळी 5 या वेळेत बंदी घातली आहे.






देशात कोरोनाचा उद्रेक


सोमवारी देशात कोविड 19 च्या नवीन 1,03,558 नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकूण 478 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आज कोविड 19 च्या नवीन 96,982 रुग्णांची नोंद झाली आहे. यानंतर, संक्रमित लोकांची एकूण संख्या 1,26,86,049 वर गेली. कोरोनामुळे आतापर्यंत 1,65,547 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.







 

Published at: 06 Apr 2021 08:23 PM (IST)

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.