Weather Update Today : देशातील अनेक राज्यांमध्ये गारवा (Cool Weather) जाणवू लागला आहे. काही ठिकाणी पहाटे गुलाबी थंडीसह (Winter) धुक्याची चादरही दिसून येते. अरबी समुद्रात (Arebian Sea) तयार झालेल्या 'तेज' चक्रीवादळामुळे (Tej Cyclone) देशातील हवामानावर परिणाम होताना दिसत आहे. चक्रीवादळामुळे (Cyclone Tej) केरळ (Karala) मध्ये पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा (Rain Prediction) इशारा, हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. अनेक भागांत वादळी वारे वाहण्याची आणि विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.


तेज चक्रीवादळाचं अतिशय तीव्र चक्रीवादळात रूपांतर


तेज चक्रीवादळ आज 25 ऑक्टोबरच्या संध्याकाळी खेपुपारा आणि चितगाव दरम्यान बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे, अश माहिती हवामान खात्याने दिली आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ 'तेज' रविवारी अतिशय तीव्र चक्रीवादळात रूपांतरित झालं आहे. यामुळे, बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण होईल. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं मंगळवारपर्यंत चक्रीवादळात रुपांतर होऊ शकते. 


महाराष्ट्रातील हवामान कसं राहील?


देशात काही ठिकाणी पावसाची शक्यता असली, तरी राज्यात मात्र उन्हाच्या झळा बसणार आहेत. चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील हवामानावर काही खास परिणाम होणार नाही. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील पाच दिवस पाऊस पडण्याचा अंदाज नाही. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. राज्यातील तापमानात वाढ होणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.






हवामान खात्यानं सांगितलं आहे की, बुधवारी, 25 ऑक्टोबरला दिल्लीतील येथील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत राहू शकते. सध्या दिल्लीत पावसाची शक्यता नाही. मंगळवारी दिल्लीतील किमान तापमान सामान्यपेक्षा एक अंश कमी म्हणजेच 16.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. येत्या पाच दिवसांत दिल्लीत धुके वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्लीसह लखनौमध्ये पुढील पाच दिवस धुके राहण्याची शक्यता आहे.


'या' भागात पावसाची शक्यता


भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच 25 ऑक्टोबरला मणिपूर, नागालँड, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबत पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत डोंगराळ भागात पार आणखी खाली जाईल, कारण, हवामान विभागाने बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. हिमाचल प्रदेशातील काही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.