Weather Updates: आग्नेय बंगालचा उपसागर आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी (10 मे) चक्री वादळात बदलू शकते. भारतीय हवामान विभाग (IMD) ने मंगळवारी (9 मे) सांगितले की चक्रीवादळ 12 मे च्या सकाळपर्यंत सुरुवातीला उत्तर-वायव्य दिशेने सरकण्याची आणि नंतर बांगलादेश-म्यानमार किनारपट्टीकडे सरकण्याची अपेक्षा आहे.
हवामान विभागाने मच्छीमार आणि लहान जहाजे, बोटी आणि मासेमारी नौकांच्या चालकांना मंगळवारपासून आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि मध्य बंगालच्या उपसागराच्या लगतच्या भागात न जाण्याचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने पूर्व-मध्य उपसागर आणि उत्तर अंदमान समुद्रात उपस्थित असलेल्या लोकांना सकाळीच समुद्रातून परत येण्यास सांगितले आहे.
अंदमान समुद्रावर हवेचा कमी दाब
आग्नेय बंगालचा उपसागर आणि बंगाल आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात रुपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 10 मे रोजी आग्नेय बंगालच्या उपसागरात." पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात आणि अंदमान समुद्राच्या लगतच्या भागात चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे.
हलका ते मध्यम पाऊस संभवतो
येत्या काही दिवसांत पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे सुरू होऊ शकतात. यातून निर्माण झालेल्या चक्रीवादळाला मोखा असे नाव देण्यात आले आहे. हवामान खात्याने सांगितले की, मंगळवार ते गुरुवार या कालावधीत अंदमान आणि निकोबार बेटांमधील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. त्रिपुरा आणि मिझोराममध्ये 13 आणि 14 मे रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागालॅंड, मणिपूर आणि दक्षिण आसाममध्ये 14 मे रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुढील 24 तासात 38-40 अंश सेल्सिअस तापमान
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोलकातामध्ये मंगळवारी 38.5 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 29.5 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. दक्षिण बंगालमधील जिल्ह्यातील तापमान 38-40 अंश सेल्सिअसच्या आसपास राहिले. एकीकडे चक्रीवादळाचे ढग घोंगावत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला.