International Women's Day आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं नारीशक्तीचा जागर सर्वत्र केला गेल्याचं पाहायला मिळालं. सर्वांनीच त्यांच्या जीवनात असणाऱ्या स्त्रीच्या प्रत्येक रुपाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तिथं झारखंडमध्ये महिला दिनाच्या निमित्तानं एक अनपेक्षित आणि तितकंच लक्षवेधी चित्र पाहायला मिळालं.


लक्षवेधी असण्याचं कारण म्हणजे, एक महिला आमदार विधानसभेत चक्क घोड्यावर स्वार होऊन आल्या. काँग्रेसच्या महिला आमदार अंबा प्रसाद रोदे (Amba Prasad rode) यांनी थेट घोड्यावरुन येत विधानसभेचा परिसर गाठला. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार निवृत्त सैन्यदल अधिकाऱ्यांनी त्यांना हा अश्व भेट स्वरुपात दिला होता.


महिला दिनी अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा; महिलेच्या नावावर घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत


महिला दिनाच्या निमित्तानं हा घोडा आपल्याला निवृत्त कर्नल रवी राठोड यांनी भेट स्वरुपात दिला, असं त्या महिला आमदार म्हणाल्या. वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेल्या काही छायाचित्रांमध्ये मोठ्या दिमाखात आणि ऐटीत अंबा प्रसाद या विधानसभा परिसरात आलेल्या दिसत आहेत. यावेळी त्यांच्यावरच अनेकांच्या नजरा खिळल्याचं पाहायला मिळत आहे.





31 वर्षीय अंबा प्रसाद या रामगढ जिल्ह्यातील (Barkagaon) विधानसभा मतदार संघातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या महिला आमदार आहेत.