लखनऊ : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) शिया वक्फ बोर्डाचे (Shia Waqf Board) अध्यक्ष वसीम रिझवी यांनी इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म (Hindu) स्वीकारला आहे. रिझवी हे मूळत: शिया मुस्लिम आहेत. त्यांनी आता हिंदू धर्म स्वीकारला आहे. वसीम रिझवी यांनी हिंदू धर्म स्वीकारल्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. वसीम रिझवी यांनी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील डासना देवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद गिरी यांच्याकडून धर्म परिवर्तन केलं आहे. यासाठी डासना देवी मंदिरात अनेक विधी पार पडले. 


वसीम रिझवी हे अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले. रिझवी यांनी कुराणमधून 26 आयत हटवण्याची मागणीही सर्वोच्च न्यायालयात केली होती. कुराणमधील ही आयत हिंसेला बळ देतात असा त्यांचा दावा होता. त्यावेळी शिया आणि सुन्नी दोन्हींचे मौलवी यांच्यासह अनेक मुस्लिम बांधवांनी रिझवींचा निषेध करत त्यांना इस्लाम धर्मातून बेदखल करण्याची मागणी केली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना पत्र लिहून रिझवी यांनी मदरशांवर बंदी घालण्याची मागणी केली. त्यांनी मदरशांमध्ये दहशतवादाला खतपाणी घातलं जातं असा आरोप केला. त्याच्यावर इस्लामविरोधी असल्याचा आरोपही करण्यात आला होता.


कोण आहेत वसीम रिझवी?
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये जन्मलेले वसीम रिझवी हे शिया मुस्लिम आहेत. रिझवी सामान्य कुटुंबातील आहे. त्याचे वडील रेल्वे कर्मचारी होते. रिझवी सहावीच्या वर्गात शिकत असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर रिझवी आणि त्यांच्या भावंडांची जबाबदारी त्यांच्या आईवर आली. रिझवी आपल्या भावंडांमध्ये सर्वात मोठे होते. त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण आणि पदवी शिक्षणासाठी नैनिताल येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतर ते सौदी अरेबियात एका हॉटेलमध्ये छोटी नोकरी केली. त्यानंतर जपानमधील एका कारखान्यात काम केलं आणि तिथून अमेरिकेला जात एका दुकानात नोकरी मिळवली.


वसीम रिझवी यांची राजकीय कारकिर्द
वसीम रिझवी यांनी 2000 मध्ये महापालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. जुन्या लखनऊच्या काश्मिरी मोहल्ला वॉर्डमधून समाजवादी पक्षाचे (SP) नगरसेवक म्हणून निवडून आले. येथूनच त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. 2008मध्ये ते वक्फ बोर्डाचे सदस्य झाले आणि त्यानंतर ते अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर सुमारे दहा वर्षे बोर्डावर होते. 2012 मध्ये शिया वक्फ बोर्डाच्या मालमत्ते अफरातफर केल्याप्रकरणी पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. 


रिझवी यांनी केलेली वादग्रस्त विधानं


देशातील नऊ वादग्रस्त मशिदी हिंदूंच्या ताब्यात द्याव्या.
बाबरी मशिदीची संरचना ही भारताच्या मातीला लागलेला कलंक आहे.
प्रेषित मोहम्मद आपल्या काफिल्यात पांढरा किंवा काळा ध्वज वापरत.
इस्लामिक मदरसे दहशतवादाला प्रोत्साहन देतात म्हणून बंद केले पाहिजेत.
अनेक मदरशांमध्ये दहशतवादी प्रशिक्षण दिले जाते, आधुनिक शिक्षण दिले जात नाही.
मुलांना प्राण्यांप्रमाणे वाढवल्याने देशाचे नुकसान होते.
चंद्र तारा असलेला हिरवा ध्वज इस्लामचा धार्मिक ध्वज नाही, पाकिस्तान मुस्लिम लीगसारखा आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha