Putin India Visit : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आज भारत दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट दोन वर्षांनी होणार आहे. 21 व्या भारत-रशिया (Indo-Russia Summit) वार्षिक शिखर परिषदेसाठी घेण्यात येणार आहे. पुतीन यांच्या सहा तासांच्या भारत दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये एकूण 10 करारांवर स्वाक्षऱ्या होणार आहेत. हे करार धोरणात्मक दृष्या महत्त्वाचे असतील, असे मानले जात आहे. 2000 सालापासून भारत-रशिया वार्षिक शिखर परिषद पार पडत आहे. त्यामुळे यंदाचं हे 21 वं वर्ष असणार आहे. अफगाणिस्तानात तालिबानी राज्य आल्यानंतरही मोदी आणि पुतिन यांच्यातील ही पहिलीच भेट असल्याने या विषयावर काय चर्चा होणार? हा एक मोठा प्रश्न आहे. तसंच नुकतीच भारत-चीन-रशिया त्रिपक्षीय बैठक पार पडली. त्यानंतर भारत आणि चीन यांच्या सीमेवर तणाव आणखी वाढले आहेत. त्यामुळे या दौऱ्यावर चीनबाबतही महत्त्वाची चर्चा होऊ शकते.
या भेटीतील महत्त्वाचे मुद्दे :
भारत-रशिया 21 वी वार्षिक परिषद
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन 21 व्या वार्षिक भारत-रशिया शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत येणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली रशियाचे शिष्टमंडळ पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची भेट घेणार आहे. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात वैयक्तिक बैठक होईल.
मोदी - पुतिन यांची दोन वर्षांनी भेट
मोदी आणि पुतिन 2019 नंतर प्रथमच आमने-सामने भेटणार आहेत. नोव्हेंबर 2019 मध्ये ब्राझिलिया येथे झालेल्या BRICS परिषदेच्या दरम्यान दोघांची भेट झाली होती.
दोन्ही राष्ट्रांतील संबंध विसृत करण्याबाबत चर्चा
राष्ट्राध्यक्ष पुतिन नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भारत-रशिया संबंधांना नवा विस्तार देण्याच्या धोरणावर चर्चा करतील. यादरम्यान, ते दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या पर्यायांसह परस्पर हिताच्या बहुपक्षीय प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर सखोल चर्चा होईल.
भारत-रशिया संरक्षण मंत्र्यांसह बैठक
त्यांच्या आधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत रशियाचे संरक्षण मंत्री सेर्गेई शोईगु आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव यांच्याशी भेट घेतली. ही बैठक लष्करी-तांत्रिक सहकार्यावरील आंतर-सरकारी आयोगाच्या अंतर्गत होणार आहे. पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि रशियाचे संरक्षण मंत्री सेर्गेई शोईगु यांच्यासोबत बैठक होईल. याआधी भारताने अशी बैठक केवळ अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानसोबत केली आहे.
पुतीन यांच्या भेटीतून भारताला काय मिळणार?
भारत आणि रशिया यांच्यात 10 वर्षांचा लष्करी-तांत्रिक करार होण्याची शक्यता आहे. यामुळे 2031 पर्यंत रशियाकडून भारताला अत्याधुनिक तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा होईल. संरक्षण उपकरणांमध्ये स्वावलंबी होण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारताला याचा थेट फायदा होईल. उदाहरणार्थ, रशियन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) भविष्यातील फ्युचरिस्टिक वेपन सिस्टम विकसित करण्यास सक्षम असेल.
पुतीन यांच्या दौऱ्याच्या शेवटी दोन्ही देशांचे संयुक्त निवेदन जारी केले जाईल. यामध्ये दोन्ही देशांमधील चर्चा आणि करारांची माहिती देण्यात येईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron Corona Variant : 5 राज्य, 21 रुग्ण; लसवंतांनाही संसर्ग, देशात वाढतोय ओमायक्रॉन, काळजी घ्या
- ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनकाच्या लशीमुळे का होतात रक्ताच्या गुठळ्या? शास्त्रज्ञांनी सांगितले कारण!
- Pakistan Mob lynching Case : पाकिस्तानातील श्रीलंकन नागरिक हत्याकांड प्रकरण, 800 जणांवर गुन्हा दाखल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha