लखनौ : बिहारमधील विकासशील इन्सान पार्टीचे (VIP) प्रमुख मुकेश साहनी यांच्या वडिलांची हत्या करण्यात आली आहे. मुकेश साहनी यांच्या विडिलांचे नाव जितन साहनी आहे. ते 65 वर्षांचे होते. या धक्कादायक घटनेमुळे बिहारच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मुकेश सहानी यांचा व्हीआयपी हा पक्ष सध्या इंडिया आघाडीसोबत आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत. 


धारदार शस्त्राने हत्या केल्याची माहिती


मिलालेल्या माहितीनुसार जितन साहनी यांची अज्ञाताने हत्या केली आहे. आज सकाळी (16 जुलै) दरभंगा येथील त्यांच्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. धारदार शस्त्राने हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. मुकेश साहनी हे बिहारमधील महागठबंधन मधील सहकारी आहेत. लोकसभा निवडणुकीत साहनी यांनी तेजस्वी यादव यांच्यसोबत अनेक सभा घेत बिहारमध्ये वातावरण निर्मिती केली होती.






आरोपी लवकरच तुरुंगात असतील- उपमुख्यमंत्री


जितन साहनी यांच्या हत्येनंतर बिहारच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या हत्या प्रकरणावर बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "या घटनेमध्ये दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. यातील आरोपी लवकरच तुरुंगात असतील. बिहारचे सरकार मुकेस साहनी यांच्या कुटुंबियांसोबत आहे," असे चौधरी म्हणाले.


घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा


जितन साहनी यांच्या हत्येनंतर घटनास्थळाचे काही फोटो समोर आले आहेत. घटनास्थळाच्या पाहणीवरून जितन साहनी यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुकेश साहनी यांचे वडील जितन साहनी हे त्या घरात एकटेच राहायचे. हत्येच्या या घटनेनंतर या परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.


हेही वाचा :


नितीश कुमार भाजपला झटका देणार?; माजी मंत्र्याने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, विविध मुद्द्यांवर एकमत


Jagannath Puri : तब्बल 46 वर्षांनंतर देशातील सर्वात मोठ्या खजिन्याचं कुलूप उघडलं; जगन्नाथ पुरी मंदिराचं धन पाहून व्हाल थक्क


VIDEO : रेल्वे पुलावर कपल फोटोशूट करणं अंगलट, मागून सुस्साट ट्रेन येताच 90 फूट उंचीवरुन उडी;पुढे जे घडलं...