नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या नव्या प्रमुखांच्या नावाची घोषणा झाली आहे. व्हॉईस अॅडमिरल आर हरी कुमार हे आता नौदलाचे प्रमुख असतील. नौदलाचे सध्याचे प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह 30 नोव्हेंबरला निवृत्त होणार असून त्याच दिवशी व्हॉईस अॅडमिरल आर हरी कुमार हे नौदलाच्या प्रमुखपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
व्हॉईस अॅडमिरल आर हरी कुमार यांचा जन्म 12 एप्रिल 1962 रोजी केरळमधील त्रिवेंद्रम या ठिकाणी झाला. त्यांनी आतापर्यंत व्हॉईस ऑफ डिफेन्स स्टाप, चीफ ऑफ पर्सनल, द फ्लॅग ऑफिसर कमांडिंग वेस्टर्न फ्लीट या पदांवर काम केलं आहे. तसेच नेव्हल वॉर कॉलेज गोवाच्या कमांडंट पदाची जबाबदारीही त्यांनी पेलली आहे. सेशेल्स सरकारचे नेव्हल सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं आहे.
मुंबई विद्यापीठातून त्यांनी डिफेन्स अन्ड स्ट्रॅटेजिक स्टडिज या विषयातून त्यांनी एमफिल केलं आहे. त्यांनी त्रिवेंद्रमच्या गव्हर्नमेन्ट आर्ट्स कॉलेजमधून प्रि डीग्री कोर्स पूर्ण केला.
व्हॉईस अॅडमिरल आर हरी कुमार यांना आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना परम विशिष्ट सेवा मेडल, अति विशिष्ट सेवा मेडल या पुरस्काराने सन्मानित केलं आहे. आयएनएस रंजित या युध्दनौकेवर त्यांना तोफखाना प्रमुख या पदाची जबाबदारीही देण्यात आली होती. तसेच आयएनएस विराट या युद्धनौकेवरही त्यांनी आपली सेवा बजावली आहे.
संबंधित बातम्या :