नवी दिल्ली: हिंदी जगतातील प्रसिद्ध गीतकार आणि कवी गोपालदास नीरज यांचं वयाच्या 93 वर्षी निधन झालं. गुरूवारी संध्याकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात नीरज यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रकृती खालावल्यानं गोपालदास नीरज यांना बुधवारी आग्रा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. अखेर गुरूवारी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
4 जानेवारी 1925 रोजी जन्मलेल्या नीरज यांचा जन्म झाला. त्यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहीट गाणी दिली. 1991 मध्ये पद्मश्री आणि 2007 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच नीरज यांना तीन वेळा फिल्म फेअर अवार्डनेही सन्मानित करण्यात आलं होतं.
प्रसिद्ध गीतकार आणि कवी गोपालदास नीरज यांचे निधन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jul 2018 10:12 AM (IST)
1991 मध्ये पद्मश्री आणि 2007 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच नीरज यांना तीन वेळा फिल्म फेअर अवार्डनेही सन्मानित करण्यात आलं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -