नवी दिल्ली सर्वसामान्यांसाी मोठी बातमी आहे. मोदी सरकार लवकरच इंधन आणि खाद्यतेलावरील कर कमी करणार आहे, ज्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol Diesel Price) कमी होतील. तसंच, भाज्यांचे दर कमी करण्यासाठी देखील पाऊलं उचलली जाणार आहेत. यासाठी विविध मंत्रालयांच्या बजेटमधून एक लाख कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. गेल्या 15 महिन्यांमध्ये महागाई (Inflation) प्रचंड वाढली आहे. येत्या डिसेंबर महिन्यात पाच राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे, तर एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये लोकसभा निवडणुका आहेत. महागाईमुळे सरकारं पडल्याचा इतिहास सर्वच राजकीय पक्षांना माहीत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या वर्षात जनतेचा रोष पत्करणं मोदी सरकारला परवडणारं नाहीये, असं तज्ज्ञांचं मत आहे.  


नुकतेच महागाई निर्देशांकाचे जे आकडे आले होते त्यामध्ये गेल्या महिन्यात महगाई पाच टक्क्यावरून साडेसात टक्क्यांपर्यंत वाढली होती. कांदे आणि टोमॅटोचे दर वाढल्याने सरकार पडल्याचे आपल्याकडे उदाहरण आहे. त्यमुळे या सर्व पार्शवभूमीवर मोदी सरकार सतर्क झाले आहे. मागील वर्षी अबकारी करात आणि पेट्रोल डिझेलसंदर्भात सरकारने सवलत दिली होती. आता दुसऱ्यांदा मोदी सरकारचा अशा प्रकारची सवलत देण्याचा विचार आहे. त्यासाठी एक लाख कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. जवळपास 19 रुपये पेट्रोलवर आणि डिझेलवर 15 रुपये अबकारी कर सध्या केंद्र सरकार घेत आहेत. यावरून अनेक वेळा केंद्र सरकारवर टीका होत असते. पेट्रोल आणि डिझेलचे दर आता शंभरीपार गेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर कपात करता येईल का याचा विचार मोदी सरकार करत आहे. ही कपात करताना वित्तीय तूटीचे समीकरण बिघडणार नाही अशी दुहेरी मोदी सरकारला करावी लागणार आहे.


येत्या आठवड्यात पंतप्रधान मोदी निर्णय घेण्याची शक्यता


वित्तीय तूटीचे भार अधिक वाढू नये यासाठी काही मंत्रालयांचे बजेट देखील कमी करण्याची शक्यता आहे. सध्या अशा चर्चा आहेत  यासंदर्भात नेमका कधी निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. गेल्या वर्षी देखील सरकारने सवलत दिली होती. आता आगामी निवडणुका पाहता सरकार असा निर्णय घेण्याची दाट शक्यता  आहे. येत्या आठवड्यात पंतप्रधान मोदी हा निर्णय घेऊ शकतात.


वर्षभरात अशी झाली दरवाढ


महागाईमुळे देशभरातील सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले आहेत. विशेषत: खाद्यपदार्थांच्या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. काही काळापासून टोमॅटो आणि हिरव्या भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे दुधाच्या दरातही कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्यांना बजेट सांभाळण्यासाठी दूधही जपून वापरावं लागत आहे.  सरकारी आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात दुधाच्या दरात 10 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. मसाल्यांच्या किमतीही भडकल्या आहेत. आता पुढील एक-दोन महिन्यात कांद्याचे भाव दुप्पट होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.


हे ही वाचा :


डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू; महागाईची टांगती तलवार, असा होणार तुमच्यावर परिणाम