Vande Bharat Express : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शुक्रवारी गांधीनगर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखवला. माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी सकाळी 10.30 वाजता गांधीनगर रेल्वे स्थानकावरून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यानंतर पंतप्रधानांनी गांधीनगर ते कालुपूर रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वेने प्रवास केला. यादरम्यान ते लोकांशी बोलतानाही दिसले. मुंबईकरांसाठी पहिली वंदे भारत एक्सप्रेस उद्यापासून नियमित रूपात सुरू होणार आहे,
मुंबईकरांसाठी पहिली वंदे भारत एक्सप्रेस
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गांधीनगर स्थानकातून या नव्या सुपरफास्ट एक्सप्रेसला झेंडा दाखवण्यात आला, ही ट्रेन सेकंड जनरेशन वंदे भारत एक्सप्रेस आहे, पूर्णतः भारतात बनवण्यात आलेली ही भारताची सेमी सुपरफास्ट एक्सप्रेस आहे, पूर्णतः वातानुकूलित असलेल्या या ट्रेनमध्ये चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह कार असे दोन क्लास असतील,
वेळ
मुंबई सेंट्रल वरून ही गाडी दररोज सकाळी 6.10 वाजता सुटेल आणि गांधी नगर स्थानकात दुपारी 12.30 पर्यंत पोचेल,
तर त्याच दिवशी दुपारी गांधी नगर येथून 2.05 ला सुटून संध्याकाळी 8.35 ला मुंबई सेंट्रल स्थानकात पोचेल,
तिकीट दर
मुंबई-अहमदाबाद चेअर कारसाठी (सीसी) 1385 रुपये आणि एक्झिकेटिव्ह कारसाठी (ईसी) 2505 रुपये असे तिकीट दर आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आलेले नवीन गाडीतील बदल :
ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीम,
आपत्कालीन स्थिती सगळ्यासाठी प्रत्येक डब्यात चार आपत्कालीन सिग्नल
क्रश प्रोटेक्शन मेमरी सह ड्रायव्हर आणि कार्डचे संभाषण रेकॉर्ड करणारी सिस्टीम
ॲडव्हान्स फायर डिटेक्शन सिस्टीम
पॅसेंजर आणि गार्ड मधील संभाषणाचे रेकॉर्डिंग करणारी सिस्टीम
सेंट्रलाइज कोच मॉनिटरिंग सिस्टीम
डब्यातील जंतूंचा नाश करणारी हवा शुद्ध करणारी यंत्रणा
सेकंड जनरेशन वंदे भारत एक्सप्रेसची वैशिष्ट्ये
0 ते 160 kmph फक्त 129 सेकंदात ( आधी 145 सेकंड )
रिजेनेरेशन - 35 टक्के ( आधी 29 टक्के )
वातानुकूल यंत्रणा - ऊर्जा वाचविणारी vvvf ड्राईव्ह यंत्रणा ( आधी डायरेक्ट ड्राईव्ह )
रुळांवर 650 मिमी पर्यंत पाणी साचले असल्यास गाडी धावू शकेल ( आधी 400 मिमी पर्यंत )
बॅटरी बॅक अप - 3 तास ( आधी एक तास )