TET Certificate : शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्राची  (TET Certificate) मर्यादा आता  आजन्म करण्यात  आली आहे. त्यामुळे याचा फायदा शिक्षकी पेशा निवडणाऱ्या उमेदवारांना होणार आहे. या अगोदर या प्रमाणपत्राची वैधता 7 वर्षासाठी होती. या कालावधीत जर उमेदवाराला नोकरी लागली नाही तर पुन्हा परीक्षा द्यावी लागत होते. त्यामुळे आता या निर्णयामुळे इच्छुक शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल (Education Minister Ramesh Pokhriyal ) यांनी प्रमाणपत्राची वैधता आजन्म केल्याची घोषणा केली आहे. 


केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल म्हणाले,  राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना  शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नवे प्रमाणपात्र देण्याचे आदेश देण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच 2011 या वर्षानंतर  ज्या उमेदवाराचे शिक्षण पात्रता प्रमाणपत्र समाप्त झाले आहे  त्यांना हे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 



सरकारच्या या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. 2011 या वर्षापासून टीईटी (Teachers Eligibility Test) टीईटी सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी आजन्म करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री पोखरियाल म्हणाले, या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना नोकरीच्या संधी मिळण्यास मदत होईल. शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हा निर्णय 2011 या वर्षांपासून लागू होणार आहे. ज्या उमेदवारांचे सर्टिफिकेट 2011 वर्षानंतर समाप्त झाले आहे त्यांना आजन्म प्रमाणपत्र नव्याने मिळेल.तसेच शिक्षण भरतीसाठी हे उमेदवार ग्राह्य धरले जाणार आहे.



सरकारी शाळांमध्ये  शिक्षकाची नोकरी मिळवायची असेल तर टीईटी परीक्षा पास होणे गरजेचे आहे. जे उमेदवार पास होतात त्यांनाच शिक्षक म्हणून  मिळते.अगोदरच्या नियमानुसार 7 वर्षांच्या आत उमेदवार शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज करू शकत होता.  मुदत संपल्यावर पुन्हा  उमेदवारला टीईटी परीक्षा देणे बंधनकारक होते. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI