Valentine’s Day 2023 : व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात झाली आहे. हा महिना प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत प्रत्येकजण हा दिवस अधिक खास पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करतो. तर, 14 फेब्रुवारी रोजी आपल्या पार्टनरप्रती असलेलं प्रेम व्यक्त केलं जातं. दरम्यान, पशु कल्याण मंडळाने (Animal Welfare Board) व्हॅलेंटाईन डे ऐवजी 14 फेब्रुवारीला 'काऊ हग डे' (Cow Hug Day) साजरा करण्याची मागणी केली आहे. 14 फेब्रुवारीला गायींना मिठी मारून त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करावे आणि व्हॅलेंटाईन डे ऐवजी 'काऊ हग डे' साजरा करावा, अशी प्राणी कल्याण मंडळाने आवाहन केलं आहे. 




“सर्व गाईप्रेमींनी 14 फेब्रुवारी हा दिवस गाईचे महत्त्व लक्षात घेऊन आणि जीवन आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण बनवून गायींना मिठी मारून हा दिवस साजरा करावा,” असे पशु कल्याण मंडळाच्या नोटीसमध्ये म्हटलं आहे.


गायीला मिठी मारण्याचे वैज्ञानिक महत्त्व


तुम्हाला हे जाणून कदाचित आश्चर्य वाटेल पण, प्राणी कल्याण मंडळाने केलेल्या आवाहनात विज्ञान दडलं आहे. बीबीसीच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, गायीला मिठी मारणे केवळ त्यांच्या आरोग्यासाठीच नाही तर माणसांच्या आरोग्यासाठीही चांगले आहे. यामुळे शरीराला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि ऑक्सिटोसिन हार्मोन देखील वाढते ज्यामुळे तणाव कमी होतो. याशिवाय पाळीव प्राण्यांबरोबर थोडा वेळ घालवणे, त्यांच्यासोबत खेळणे, बसणे यामुळे मनाला शांती मिळते.


2017 मध्ये मोठ्या पाळीव दुभत्या जनावरांवर केलेल्या संशोधनातून असेही समोर आले आहे की, गायीच्या मानेला आणि पाठीवर काही काळ काळजी घेतल्यास गायीला खूप आराम मिळतो आणि ती माणसाला ओळखू लागते. त्यामुळेच गावात राहणारे लोक, शेतकरी आणि पशुपालक गायीकडे केवळ प्राणी म्हणून पाहत नाहीत, तर कुटुंबातील सदस्य म्हणून तिचे संगोपन करतात. चांगल्या दुग्धोत्पादनासाठी आणि जनावरांना सुरक्षित वाटावे म्हणून त्यांना मिठी मारण्याची प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहे.


'या' देशांमध्ये सुरू आहे काऊ हग थेरपी


गायीला मिठी मारणे ही खरंतर नवीन संकल्पना नाही, परंतु भारतापासून नेदरलँड्सपर्यंतच्या ग्रामीण भागात गायीला मिठी मारणे ही थेरपी म्हणून वर्णन केले गेले आहे. याला 'को नाफ्लेन' थेरपी म्हणतात, ज्यामुळे गाईचे तसेच तिला मिठी मारणाऱ्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य चांगले राहते.  


महत्त्वाच्या बातम्या : 


Propose Day 2023 : 'प्रपोज डे' निमित्त तुमच्या प्रिय व्यक्तीला प्रपोज करताय? बेस्ट पार्टनरसाठी तुमच्यात असायला हवेत 'हे' गुण