नवी दिल्ली : दिल्लीमध्ये सध्या कोवॅक्सिन आणि कोविशिल्डचा साठा संपला असल्याने 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करण्यात येत आहे. केंद्र सरकारने लवकरात लवकर दिल्लीसाठी लसी उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यानी केली आहे. 


दिल्लीचे मुख्ममंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, "कोरोनाची लस ही कोरोनाविरोधातील लढ्याचं सर्वात मोठं हत्यार आहे. त्यामुळे आम्ही केंद्र सरकारकडे अपील करतो की दिल्लीला लवकरात लवकर कोरोनाची लस मिळावी. त्यामुळे लसीकरणाचा कार्यक्रम पुन्हा सुरु करता येईल. तसेच दिल्लीला मिळणारा कोरोना लसीचा कोटाही वाढवून द्यावा."


 




अरविंद केजरीवाल म्हणाले की, "दिल्लीमध्ये दर महिन्याला 80 लाख कोरोनाच्या लसीचे डोसची गरज आहे. या तुलनेत दिल्लीला केवळ 16 लाख लसीचे डोस मिळतात. जून महिन्यासाठी तर याहूनही कमी म्हणजे केवळ 8 लाख डोस मिळणार आहेत. जर दिल्लीसाठी महिन्याला केवळ 8 लाख कोरोनाचे डोस मिळाले तर सर्व प्रौढांचे लसीकरण करायला 30 महिन्यांचा कालावधी लागेल."


आजपासून युवकांचे लसीकरण बंद
दिल्लीत कोरोना लसीचा असलेला तुटवडा पाहता आजपासून युवकांना देण्यात येणारे लसीकरण बंद झाल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने दिलेल्या लसी संपताच युवकांचे लसीकरण बंद होणार आहे. दिल्लीमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भाव आता कमी येत असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. 


महत्वाच्या बातम्या :